Fighter : हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी झलक! ‘फायटर’ मधल नवं गाणं रिलीज
Fighter : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्यांचा आगामी चित्रपट “फाइटर” (Fighter) रिलीज करण्याच्या गडबडीत आहेत. त्याच दरम्यान चित्रपटातील आणखी एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “हीर आसमानी” या त्यांच्या नवीन गाण्याद्वारे प्रेक्षकांना हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार आहे.
गाण्याच्या निर्मितीबद्दल सिद्धार्थ आनंद म्हणतात “हीर आसमानी ” हे गाणं हवाई दलातील पायलटांच्या जीवनाची एक झलक दाखवून देणारं आहे. तुम्ही त्यांना ड्युटीवर – ब्रीफिंग रूममध्ये, प्रशिक्षण सत्रांमध्ये, त्यांच्या मिशनची तयारी करताना पाहता. पण त्यांच्या आयुष्याची आणखी एक बाजू आहे. ती म्हणजे जेव्हा ते लॉकर रूममध्ये असतात त्यांच्या डाउनटाइममध्ये त्यांच्या निवासस्थानी असतात बोनफायर्समध्ये गिटार वाजवतात. हे सर्व आमच्या फायटरांच्या या वास्तविक जीवनशैलीचे विविध पैलू आहेत. तेच यातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.
काँग्रेसमध्ये खिंडार? अनुराधा नागवडेंच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीसमोर पेच
सिद्धार्थ आनंद पुढे म्हणतात “हीर अस्मानी हे हवाई बेस कॅम्प ते काश्मीरपर्यंतच्या खर्या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. प्रत्येक पार्श्वभूमी गाण्याचा एक विशिष्ट पैलू दाखवते. हवाई बेसवर आम्ही लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरने शूट केले आहे आणि ते प्रत्येक फ्रेम खास करतात. हॅन्गरवर ब्रीफिंग सीन शूट करणे हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यानंतर आम्ही काश्मीरमध्ये अति कमी तापमानात शूट केलेले ऑफ-ड्यूटी टीम बाँडिंग सीन होते.
राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज; विखेंचा हल्लाबोल
काश्मीरमध्ये शूटिंग करण्याचं स्वप्न पूर्ण झाल. एक चित्रपट निर्माता म्हणून मला नेहमी सेल्युलॉइडवर त्याचे सौंदर्य सौंदर्य कॅप्चर करायचे होते. मला आनंद आहे की, माझ्या पहिल्या निर्मितीसह मला माझ्या बकेटलिस्टमधून हे शूट करता आल. संपूर्ण कलाकार आणि क्रू यांना कबड्डी खेळण्यात खूप मजा आली. हिमवर्षाव एकत्र राहणे आणि याला खऱ्या जीवनातील बाँडिंग एक्सरसाईज म्हणून देखील आम्ही मानल कारण आमच्या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच काश्मीरचे वेळापत्रक जाणूनबुजून ठेवले होते. त्यामुळे शाब्दिक अर्थाने काश्मीर हे आमच्यासाठी आईस ब्रेकिंग शेड्युल होत.
“फायटर” एक व्हिज्युअल एक्स्ट्राव्हॅगान्झा असणार आहे यात शंका नाही जे प्रेक्षकांना वास्तविक जीवनातील हवाई दलाच्या जवानां च जीवनाचा अनुभव देणार आहे. “हीर आसमनी” हे गाणं नक्कीच खास ठरणार आहे. भारतातील पहिले एरियल अॅक्शन मॅग्नम ऑपस म्हणून ओळखले जाणारे वायकॉम18 स्टुडिओने मारफ्लिक्स पिक्चर्सच्या सहकार्याने “फायटर” सादर करण्यात येणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.