‘पुष्पा २’चा दिग्दर्शक सुकुमारच्या घरावर IT चा छापा, अधिकाऱ्यांनी विमानतळावरून घेतले ताब्यात…

  • Written By: Published:
‘पुष्पा २’चा दिग्दर्शक सुकुमारच्या घरावर IT चा छापा, अधिकाऱ्यांनी विमानतळावरून घेतले ताब्यात…

IT Raid on Pushpa Director Sukumar: चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केल्यानंतर आता ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) रडारवर आले आहेत. आज (२२ जानेवारी) प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुकुमार यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. छाप्यादरम्यान सुकुमार घरी नव्हते. त्यांना हैदराबाद विमानतळावरून (Hyderabad Airport) पकडण्यात आले.

Video : पालकमंत्री पद गेलचं आता मंत्रीपदही गोत्यात?; दमानियांनी धनंजय मुंडेंचा कट्टाचिठ्ठाचं काढला 

बुधवार (२२ जानेवारी) रोजी आयकर विभागाने सुकुमार यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. सुकुमार यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. जेव्हा आयकर विभागाने सुकुमार यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा सुकुमार हे हैदराबाद विमानतळावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांना त्यांच्यावर करचुकवेगिरीचा संशय आहे. सध्या सुकुमार यांच्या घरातून आणि कार्यालयातून विविध कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांना अद्याप छाप्यात काय सापडले हे अद्याप कळू शकलेले नाही. अद्याप प्राप्तिकर विभागाने या छापेमारीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसेच सुकुमार यांनीही याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

विशेष म्हणजे, काल (२१ जानेवारी) आयकर विभागाच्या सुमारे ५५ पथकांनी हैदराबादमध्ये आठहून अधिक ठिकाणी अचानक छापे टाकले. २१ जानेवारी रोजी सकाळी सुरू झालेला ही छापेमारी सायंकाळपर्यंत सुरू होती. या छाप्यांमध्ये ‘ ‘गेम चेंजर’चे निर्माते दिल राजू यांच्या घरावरही छापा टाकला. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली तेलंगणा आयकर विभागाने ही छापा टाकला. दिल राजू हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे आहेत. ते श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स या निर्मिती कंपनीचे मालक आहेच.

शपथ घेताच ट्रम्प यांचे हादरवणारे निर्णय… 48 लाख भारतीय टेन्शनमध्ये! 

‘पुष्पा २’ ने केली भरघोस कमाई

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने १५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नासह फहाद फासिल, सुनील आणि राव रमेश हे मुख्य भूमिकेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube