Jigraa on OTT: ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येईल आलिया भट्टचा ‘जिगरा’
Jigraa OTT Release: आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘जिगरा’ (Jigraa Movie) त्याच्या घोषणेपासून चर्चेत आहे. हा चित्रपट एका धाडसी बहिणीच्या तिच्या भावावर असलेल्या अपार प्रेमाभोवती फिरतो. ‘जिगरा’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हे आधी (OTT) ओटीटीवर प्रदर्शित होणार असले तरी आलिया भट्ट स्टारर ‘जिगरा’ आता 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आलियाचा (Alia Bhatt) ‘जिगरा’ ओटीटीवर नेमकं कुठे रिलीज होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया…
View this post on Instagram
ओटीटीवर ‘जिगरा’ कधी आणि कुठे पाहता येईल?
निर्मात्यांनी अद्याप ‘जिगरा’ च्या ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, स्ट्रीमिंग जायंट प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने चित्रपटाचे ओटीटी अधिकार सुरक्षित केले आहेत. म्हणजेच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. मात्र, तो कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
‘जिगरा’ स्टारकास्ट
आलिया भट्टने ‘जिगरा’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती वेदांग रैनाच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. वेदांग नुकताच झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये दिसला होता. या चित्रपटात जेसन शाह, आदित्य नंदा, युवराज विजान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Birthday Special : वेगवेगळ्या लूकमधील पाहा Alia Bhatt चे हटके फोटो
‘जिगरा’ कधी प्रदर्शित होणार?
ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याआधी, जिगराच्या टीझरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने प्रमाणित केले आहे. 2 मिनिटे आणि 52 सेकंदांच्या रनटाइमसह टीझर 4 सप्टेंबर 2024 रोजी अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आला आणि त्याला ‘UA’ रेटिंग देण्यात आले आहे. वासन बाला दिग्दर्शित, जिगरा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि आलिया भट्टच्या इटर्नल सनशाइन प्रॉडक्शनने निर्मित केला आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी दसरा सणानिमित्त थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.