Video : ‘चांदीचा उंबरा, सोन्याचा कळस…’, ग्रामदैवतंच शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला
Kadak Marathi Latest Song : ‘कडक मराठी’ (Kadak Marathi ) हे मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं युट्यूब चॅनेल आहे. अनेक गाणी, कार्यक्रम अन् वेबसीरीजच्या माध्यमातून हे चॅनल अल्पावधीतच नावारुपाला आलं. मनोरंजनाबरोबरच प्रबोधन करण्याचं काम हे चॅनेल करत आहेत. नुकतंच अक्षय्य तृतीयतेच्या मुहूर्तावर कडक मराठीचं ‘चांदीचा उंबरा, सोन्याचा कळस…’, हे ग्रामदैवत या कार्यक्रमाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला अवघ्या काही तासात युट्यूबवर चांगलीच पसंती मिळत आहे.
“बालबुद्धीने बोलणाऱ्यांकडं काय लक्ष द्यायचं” काका शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला
अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेन्टमेंट प्रस्तृत आणि वेव्ह लेंथ ब्रॅंड कॉमने या गीताची निर्मिती केली आहे. तर स्पेशल पार्टनर पितांबरी हे असून कॉस्ट्यूम पार्टनर अम्मा गुंडू साडी हे आहेत. या गीताची संकल्पना संकेत पावसे यांची असून मेघना गोरे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गौरव चाटी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. गायक गौरव चाटी यांच्या आवाजाने हे गाणं अधिकच जल्लोशमय झालं आहे. या गीताला मुकुल काशीकर यांनी पार्श्वसंगीत संगीत दिलं आहे. शर्मिष्ठा भाटकर, सिद्धांत करावडे यांनी गाण्याला कोरस दिला.
मोठी बातमी : केजरीवालांना अखेर आंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ
‘चांदीचा उंबरा, सोन्याचा कळस…’ या गाण्याचे शुटिंग अनेक ठिकाणी झालं आहे. दिग्दर्शन अजिंक्य महादगुट यांनी केलं. अरेंजींग, प्रोग्रामिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग ही तांत्रिक बाजू सिद्धांत करावडे यांनी सांभाळली. संकलन श्रेयस बलाळ यांनी केलं. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून किरण डीडवाणीया आणि सचिन गुप्ता यांनी काम पाहिलं. साऊंड मिक्सिंग रोहित देवगावकर आणि अंकिता मोडक यांनी केलं. लोकेशन रेकॉर्डिंग आकाश बोरकर यांनी केलं. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रसाद बेडेकर यांनी काम पाहिलं. ग्राम दैवत शोसाठी आवश्यक संशोधन लेखक मंगेश कुलकर्णी करत आहेत.
निवेदिका म्हणून अभिनेत्री तृप्ती देवरे तर क्रिएटिव्ह डीजायनर म्हणून किरण गवते यांनी काम केलं. रंगभूषेचं काम स्नेहल लव्हाटे यांनी केलं.
दरम्यान, ग्रामदैवत या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्राम दैवतांचं दर्शन घडणार आहे. त्यामुळं प्रेक्षक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत.
हटके गाण्यांसाठी प्रसिध्द
कडक मराठीने याआधी ‘घरात राहा’ या गाण्यातून कोरोना काळात नागरिकांना घराबाहेर पडू नका, असा संदेश दिला होता. याशिवाय, जगप्रसिध्द गावरान मेवा या वेबसीरीजचे शीर्षक गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.