Katrina अन् विजय देणार यंदा ख्रिसमस स्पेशल गिफ्ट; आगामी ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं पोस्टर आउट 

Katrina अन् विजय देणार यंदा ख्रिसमस स्पेशल गिफ्ट; आगामी ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाचं पोस्टर आउट 

Merry Christmas Release Date Out: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) काल तिने तिच्या नवऱ्यासोबत ४० वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसाला खास बनवण्यासाठी ती नुकतीच तिचा नवरा अभिनेता विकी कौशलबरोबर (Vicky Kaushal) सुट्टीकरीत निघाली आहे. कतरिनाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी देखील तिला वाढदिवशी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)


कतरिना कैफ आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ २०२३ मधील बहुचर्चित सिनेमापैकी एक आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमाकरिता चाहते आणखीनच उत्सुक असल्याचे दिसत आहे. कारण कतरिना आणि विजय पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहेत. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या घोषणेचे वाट पाहात होते. विजय आणि कतरिना दोघांनी देखील सोशल मीडियावर (Social media) या सिनेमाच्या एका नवीन पोस्टरबरोबरच प्रदर्शनाची तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे.

अगोदर हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता. आता हा सिनेमा १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ यांनी २ पोस्टर लाँच करण्यात आले आहे. एक हिंदीमध्ये आणि दुसरे तमिळमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. दोन्ही पोस्टरमध्ये कतरिना आणि विजय असल्याचे दिसून येत आहेत, आणि या पोस्टरने चाहत्यांची मोठी उत्सुकता वाढवल्याचे दिसून येत आहे. नवीन पोस्टर विंटेज वाइब्स चाहत्यांना मिळत आहेत. हिंदी पोस्टर बघितल तर त्यामध्ये आपल्याला जुन्या मुंबईची झलक बघायला मिळालं आहे.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

पोस्टरवर ‘रात जितनी संगीन होगी, सुबह उतनी रंगीन होगी’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. हिंदी भाषेत देखील या सिनेमात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्या भूमिका आहेत. तर तमिळ भाषेतील सिनेमात राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे या दोघी अभिनेत्री कॅमिओमध्ये दिसून येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा एक क्राइम थ्रिलर आहे, याचं कथानक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येभोवती असल्याचे सांगण्यात आले आहे . तसेच ‘अंधाधून’, ‘बदलापूर’सारखे लाजवाब आणि हटके सिनेमे देणाऱ्या श्रीराम राघवन यांच्या या सिनेमाची भारतीय चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube