Kranti Redkar Post: क्रांती रेडकर म्हणते “घोर कलयुग…”, पतीसाठी अशी झाली व्यक्त

Kranti Redkar Post: क्रांती रेडकर म्हणते “घोर कलयुग…”, पतीसाठी अशी झाली व्यक्त

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar ) सोशल मिडीयावर विविध व्हिडीओमुळे चर्चेत असते. (Social media) मात्र यंदा वेगळ्या कारणासाठी तिच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओजची चर्चा होत आहे. (Video Viral ) क्रांती रेडकर ही सीबीआय अधिकारी समीर वानखेडे (CBI officer Sameer Wankhede) यांची पत्नी आहे. नुकतचं समीर वानखेडेंवर आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan case) लाच मागितल्या संदर्भातला गुन्हा दाखल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)


या प्रकरणात विविध वळण समोर येत असतानाच क्रांती रेडकर सोशल मिडीयाच्या माध्यमातून पतीचं समर्थन करत व्यक्त होताना दिसत आहे. क्रांतीने नुकतेच काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. सध्या घोर कलयुग असल्याचं ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. लहानपणी आजीने सांगितलेली गोष्ट ती या व्हिडीओत नमूद करते. ती म्हणते की, “मी जेव्हा लहान होती तेव्हा माझ्या आजीने मला एक गोष्ट सांगितली होती. कलयुगची कहाणी होती. हे कलयुग आहे. चांगलेपणाला लोकं टिकू देत नाही. जे चांगलं काम करतात त्यांना खाली पाडणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)


परंतु, जेव्हा हे चांगलं काम करणाऱ्या लोकांना सतावून, त्रास देऊन त्यांना तोडलं जाईल तेव्हा पापाचा घडा भरला जाईल. जेव्हा असे वाईट लोक पापाचा घडा भरतील तेव्हा स्वत: शिव शंकर पृथ्वीतलावर येतील आणि ते प्रलय करतील. शिव शंकर प्रलय करणारच होते तेव्हा प्रभु राम येऊन त्यांना थांबवतात. ते म्हणतात की जर प्रलय केलात तर जी उरलेली चांगली लोकं आहेत ते देखील नष्ट होतील. तेव्हा शिव शंकर प्रलय करण्यास थांबतात.”

यापुढे क्रांती म्हणते की “मी चांगलेपणासोबत आहे तुम्ही आहात का ?”तर नुकतच क्रांतीने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेयर केलाय. लोकमान्य टिळकांच्या कहाणीचं उदाहरण देत तिने व्हिडीओ केलाय. ज्यात ती म्हणते की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी क्रांती पतीच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

याआधीही समीर वानखेडे विरोधात जेव्हा वक्तव्य केली गेली तेव्हा देखील क्रांती पतीसाठी ठामपणे बोलताना दिसली होती. मात्र सत्य नेमकं काय हे लवकरच समोर येईल अशी अपेक्षा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube