Maharaj Controversy मध्ये यशराज फिल्म अन् नेटफ्लिक्सचं स्टे ऑर्डरला आव्हान; रिलीज मार्ग मोकळा?
Maharaj Controversy YRF & Netflix challenge Stay Order : आमिर खानचा (Aamir Khan) लेक जुनैद खान (Junaid Khan) लवकरच ‘महाराज’ (Maharaj Movie) या ओटीटी (OTT) चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यास तयार आहे. (Maharaj Controversy) मात्र, रिलीज होण्यापूर्वीच आमिरचा लेक जुनैदचा डेब्यू चित्रपट वादात सापडला आहे. बजरंग दलाने ‘महाराज’च्या रिलीजला विरोध करत मुंबईच्या दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच गुजरात उच्च न्यायालयाने चित्रपटावर स्टे आणला आहे. त्याला आता यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्सकडून (YRF & Netflix ) आव्हान देण्यात आले आहे.
माढ्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? मोहिते पाटलांनी रात्री उशीरा घेतली RSS च्या बड्या नेत्याची भेट
जुनैदचा महाराजा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार त्या अगोदरच हा स्टे आणण्यात आला आहे. यावर एका प्रतिष्ठित ट्रेड सोर्सने खुलासा करत सांगितले की, यशराज फिल्म आणि नेटफ्लिक्सकडून गुजरात उच्च न्यायालयाने चित्रपटावर आणलेल्या स्टेला आव्हान देण्यात आले आहे. तसेच महाराजा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. जो लेखक सौरभ शाह यांच्या महाराजा या चित्रपटावर आधारित आहे. तसेच या चित्रपटामध्ये वैष्णव संप्रादाय आणि धर्माचा कोणताही अपमान किंवा बदनामी करण्यात आलेली नाही. समाजसुधारणेबाबतचा हा चित्रपट आहे. ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. असंही या ट्रेड सोर्सने सांगितलं आहे.
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दिलासा; 17 जूनपर्यंत अटक करू नका, हायकोर्टाचे सीआयडीला आदेश
काय आहे ‘महाराज’ची कथा?
‘महाराज’ हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज बदनाम प्रकरणावर आधारित आहे, जो भारतातील सर्वात महत्वाच्या कायदेशीर लढाईंपैकी एक मानला जातो, चित्रपटात जुनैद पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका करतो, तर अहलावतने जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका केली आहे, जे प्रमुखांपैकी एक आहेत. वल्लभाचार्य पंथाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
महाराजांविरोधात बरजंग दलाने न्यायालयात याचिका दाखल
आमिर खानचा लेक जुनैद खानचा डेब्यू चित्रपट ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात बजरंग दलाने मुंबईच्या दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या याचिकेत बजरंग दलाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली एका विशेष समितीकडे चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. ‘महाराज’मध्ये हिंदू धर्मगुरूंना घोषणाबाजीत दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. बजरंग दलाचे म्हणणे आहे की या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या काही भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.