‘Bigg Boss OTT’च्या दुसऱ्या पर्वात ‘या’ मराठमोळ्या व्यक्तीची दमदार एण्ट्री

‘Bigg Boss OTT’च्या दुसऱ्या पर्वात ‘या’ मराठमोळ्या व्यक्तीची दमदार एण्ट्री

Bigg Boss: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (OTT platform) कायम चर्चेत असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी.’ (Bigg Boss OTT) या शोमधील अनेक्क स्पर्धकांच्या वागण्याने चाहत्यांचे लक्ष वेधले जात असते. आता या शोमध्ये एका मराठमोळ्या व्यक्तीची झलक पाहायला मिळणार आहे. ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल अनेकांना पडला असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा मराठी कलाकार?

बिग बॉस ओटीटीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. आशिका भाटिया आणि एल्विश यादव हे या घरातील नवे सदस्य आहेत. आता आणखी एका सदस्याच्या एंट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. बिग ओटीटीच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या मराठमोळा व्हिडीओ क्रिएटर दीपराज जाधवने (Deepraj Jadhav) चांगलीच एंट्री मारली आहे. दीपराज जाधवच्या एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये दीपराज ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात एंट्री करत असताना दिसून येणार आहे. त्याचवेळी घरातील सदस्यांना नव्या सदस्याला कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा टास्क देण्यात आला आहे. यामुळे दीपराज जेव्हा घरात एन्ट्री केला आहे, त्यावेळेस सदस्यांबरोबर संवाद साधायला जातो, तेव्हा त्याला कोणीही बोलत नसल्याचे दिसून आले आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

तसेच दीपराज हा मराठमोळा व्हिडीओ क्रिएटर आहे, त्याचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन फॉलोअर्स तर युट्यूबवर दीपराजचे २ लाख ७७ हजार सबस्क्रायबर्स असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ‘बिग बॉस’ ओटीटीच्या दुसऱ्या पर्वामध्ये आणखी ४ जणांचा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये आरजे मलिश्का, मालिनी अग्रवाल, बीसी आंटी म्हणजे स्नेहल मेहरा आणि डॅनी पंडित यांचा समावेश असणार आहे. यामुळे आता येत्या भागात यापैकी कोण घरात एंट्री करणार हे बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube