शीर्षकगीतांचे जादूगार ‘मंगेश कुलकर्णी’ यांचं निधन; कलाविश्वात शोककळा

शीर्षकगीतांचे जादूगार ‘मंगेश कुलकर्णी’ यांचं निधन; कलाविश्वात शोककळा

Mangesh Kulkarni Passed Away : मनोरंजनविश्वातून एक मोठी बातमी समोर (Mangesh Kulkarni Passed Away) आलीय. लेखक, गीतकार, अभिनेता, मंगेश कुलकर्णी यांचं १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दु:खद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गीतकार मंगेश कुलकर्णी फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेइडंस्ट्रीमध्ये देखील लोकप्रिय होते. श्रीवर्धन येथे त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळतेय.

काही खास मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांमुळं आजही भूतकाळाशी नाळ जोडलेली आहे , मंगेश कुलकर्णी अशा शीर्षकगीतांचे गीतकार होते. मंगेश कुलकर्णी यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता अखेरचा श्वास घेतला. ते मुंबईमधील पवई येथे वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नसून ते आजारी होते. भाईंदर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! नवरा माझा नवसाचा 2″ पोहचला पाचव्या आठवड्यात

कोण आहेत मंगेश कुलकर्णी? 

गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी आभाळमाया’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे शीर्षकगीत रचले होते. त्यांचं काल भाईंदर येथे वृद्धापकाळाने निधन झालंय. मंगेश कुलकर्णी यांनी अनेक मालिकांसाठी शीर्षक गीते आणि मराठी हिंदी चित्रपटांसाठी लेखन देखील लिहिली आहेत. मंगेश यांच्या निधनामुळे मालिकेच्या शीर्षकगीतांचा जादूगार आणि उत्तम पटकथाकार हरपला आहे. शीर्षकगीतांचे जादूगार म्हणून ‘मंगेश कुलकर्णी’ यांची ओळख आहे.  त्यांंचं निधन झाल्यामुळे मराठी कलाविश्वात मोठी शोककळा पसरलेली आहे.

Sonu Sood New Movie : ‘फतेह’ ची क्लिप लीक, चाहत्यांना मिळाली सोनू सूदची झलक

मंगेश कुलकर्णी हे फक्त उत्कृष्ट गीतकार नव्हते, तर त्यांनी पटकथाकार म्हणून देखील उत्तम काम केलंय. ‘लाईफ लाईन’ या गाजलेल्या टीव्ही या मालिकेची पटकथा देखील मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होती. बॉलिवूड स्टारसाठी देखील त्यांनी केलं होतं. अभिनेता शाहरुख खानच्या ‘येस बॉस’ या सिनेमाची पटकथा मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होती. मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांना उंची मिळवून देणारा अवलिया हरपल्यामुळे मनोरंजन विश्वात सध्या दु:खाची लाट आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube