Akshay Kumar: सेन्सॉर बोर्डाने OMG 2 चे रिलीज तात्पुरते थांबवले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Akshay Kumar: सेन्सॉर बोर्डाने OMG 2 चे रिलीज तात्पुरते थांबवले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Stay on ‘OMG 2’ Released: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी भैय्याचा ‘OMG 2’ हा धमाकेदार सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता सेंसॉर बोर्डाने (censor board) त्यावर बंदी घातली आहे. खरे तर तब्बल ११ वर्षांनंतर खिलाडीचा ‘ओह माय गॉड’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच ‘ओएमजी २’ चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

या सिनेमाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. आणि त्यानंतर लगेचच सिनेमाचा टीझर आउट करण्यात आला आहे. आता सेन्सॉर बोर्डने या सिनेमाच्या प्रदर्शनावर सध्या बंदी घातली असल्याची माहिती समोर आली आहे. आदिपुरुषच्या अपयशानंतर सुप्रीम कोर्टाने सेन्सॉर बोर्डला चांगलेच फटकारले आहे. आणि आता त्यानंतर सेन्सॉर बोर्ड सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. सेन्सॉर बोर्डाने खिलाडीच्या ‘OMG 2’ या सिनेमाबद्दल एक मोठा निर्णय हाती घेतला आहे.

सिनेमाला बोर्डाने प्रदर्शनासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. हा सिनेमाचा रिव्ह्यू सेन्सॉर कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे या सिनेमाला आता हिरवा सिग्नल मिळणार की लाल सिग्नल देऊन काही बदल करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे. हे पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘OMG 2’चा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमध्ये खिलाडीचा भगवान शंकराच्या तर पंकज त्रिपाठी शिवभक्त दाखवण्यात आले होते.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

या सिनेमाचा टीझर बघून सनातन धर्माचा अपमान होता कामा नये, असे नेटकऱ्यांनी अगोदरच सुनावले आहे. सिनेमामध्ये कोणत्याही धर्माची खिल्ली उडवू नयेत, तसेच हिंदूंच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावले जातील, असे काही कृत्य करू नये. तसेच यावेळी सिनेमात परेश रावल ‘ओएमजी २’मध्ये दिसणार नाहीत. त्याऐवजी पंकज त्रिपाठी यांनी आस्तिक बनून त्यांची जागा घेतली आहे. या सिनेमात यामी गौतमची देखील मुख्य भूमिका आहे. ती एक वकील म्हणून चाहत्यांना दिसून येणार आहे. परंतु, ती या टीझरमध्ये दिसली नाही. ‘ओएमजी २’ हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube