मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक केली आहे. […]
मुंबई : ‘आरआरआर’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. चित्रपटातील गाणं ‘नातु नातु ला बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे गाणं आता ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या एकूण 15 गाण्यांमध्ये आता ते समाविष्ट झाले आहे. ‘नातु नातु’ शिवाय या लिस्टमध्ये अवतार: द वे ऑफ वॉटर, […]
२००९ मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटात पाणी आणि पाण्याखालील अनोखं विश्व आपल्यासमोर मांडलंय. अद्भूत व्हिएफएक्स, रिअल साऊंड इफेक्टस आणि नेत्रदीपक दृश्ये पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘अवतार: द वे […]
मुंबई : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये आता जेनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जेनिलियाचा आगामी वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनिलिया देशमुख ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये येणार आहे. जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय. या मालिकेने […]
एखाद्या फिल्ममेकरसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असू शकतं? तर पूर्ण चित्रपट एखाद्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेऊन विचार केलेला असतो आणि अचानक त्या कलाकाराचे निधन होते. हेच घडलं मार्वलच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ ह्या चित्रपटाच्या वेळी. ब्लॅक पँथरला खरी ओळख मिळाली ती चॅडविक बोसमनच्या भूमिकेने. पण 2020 मध्येच सुपरहिरो ब्लॅक पँथर उर्फ सम्राट टीचालाची भूमिका करणारा चॅडविक […]
मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनयासह बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. मात्र आता तेजस्विनी पंडितने एक धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला आलेला एक अनुभव सांगितला की, आपल्या करिअरच्या सुरूवातीला ती पुण्यात एका फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट एका नगरसेवकाचा होता. तेजस्विनी पंडितने हा धक्कादायक खुलासा करताना […]