रजनीकांत- अमिताभ बच्चन 33 वर्षांनंतर पुन्हा एकत्र; ‘वेट्टियाँ’ आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

रजनीकांत- अमिताभ बच्चन 33 वर्षांनंतर पुन्हा एकत्र; ‘वेट्टियाँ’ आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Rajinikanth and Amitabh Bachchan Photos: भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मेगास्टार रजनीकांत (Rajinikanth ) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. एक काळ असा होता की रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र अनेक चित्रपट केले होते, पण 1991 च्या ‘हम’ नंतर हे दोन्ही मेगास्टार पुन्हा एकत्र दिसले नाहीत.


आता पुन्हा एकदा रजनीकांत आणि अमिताभ बच्चन ही जोडी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. होय… रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी ‘वेट्टियाँ’ (Vettiyan Movie) चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. रजनीकांत आणि अमिताभ स्टारर ‘वेट्टियाँ’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या सेटवरील दोन्ही मेगास्टारचे फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत.

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो व्हायरल

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘वेट्टियान’ चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर केली आहेत. पहिल्या कृष्णधवल चित्रात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र पोज देताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रजनीकांत आणि अमिताभ बच्चन एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकमेकांना बोलत आहेत. प्रॉडक्शन हाऊसने फोटो शेअर करताना कॅप्शनही लिहिले आहे की, ‘द टायटन्स ऑफ इंडियन सिनेमा. सुपरस्टार रजनीकांत आणि शहेनशाह अमिताभ बच्चन मुंबईतील वेट्टय्यानच्या सेटवर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले आहे.

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे साकारणार ‘छोटे पंडित’ची भूमिका !

रजनीकांत यांच्या 170व्या चित्रपटातून अमिताभ यांचा तमिळ पदार्पण

‘वेट्टियान’ हा भारतीय चित्रपट उद्योगातील मेगास्टार रजनीकांत यांचा 170 वा चित्रपट आहे. आणि या चित्रपटातून अमिताभ बच्चन तमिळमध्ये पदार्पण करत आहेत. ‘वेट्टियाँ’ चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वी प्रॉडक्शन हाऊसने पोस्टरसह चित्रपटगृहात रिलीज करून त्याचे कौतुक केले होते. ‘वेट्टियाँ’मध्ये रजनीकांत-अमिताभ बच्चन यांच्यासोबत फहद फाजिल, राणा दुग्गाबती, रितिका सिंह मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज