Rajkumar Rao च्या मिस्टर अँड मिसेस माहीचं पहिलं गाणं रिलीज; अनोख्या व्हर्जनची प्रेक्षकांना भूरळ

Rajkumar Rao च्या मिस्टर अँड मिसेस माहीचं पहिलं गाणं रिलीज; अनोख्या व्हर्जनची प्रेक्षकांना भूरळ

Rajkumar Rao Mr. & Mrs. Mahi First Song Release : टी ट्वेंटी लीगच्या सामन्यादरम्यान अभिनेता राजकुमार राव ( Rajkumar Rao ) आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच ( trailer out ) करण्यात आला. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ( Mr. & Mrs. Mahi ) असं या चित्रपटाचं नाव आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील अनोखं व्हर्जन असलेलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘देखा तेनू’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

Panchayat 3: ‘पंचायत 3’ सीझनमध्ये जितेंद्र कुमारसोबत रोमान्स करणारी ‘ती’ अभिनेत्री कोण? जाणून घ्या..

हे गाणं ‘कभी खुशी कभी गम’ मधील लोकप्रिय गाण्याचे रिहॅश व्हर्जन असलेले ‘देखा तेणू’ गाणं पुन्हा नव्या रुपात यात दिसणार आहे. प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन जाण्यासाठी हे गाणं सज्ज आहे. मोस्ट पॉवर पॅक्ड अभिनेत्याने हे गाणे त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करताच त्याच्या चाहत्यांना या चार्टबस्टरच्या निर्मितीबद्दल उत्सुकता दाखवली आहे.

राहुल द्रविडनंतर मुख्य प्रशिक्षक कोण? ‘हे’ नाव आहे आघाडीवर

याआधी निर्माता करण जोहरने सोशल मीडियावर या गाण्याचे वर्णन केले आहे की “यापूर्वी केलेल्या प्रेमाची शुद्धता आहे”. तो पुढे म्हणाला की हे गाणे त्याच्या हृदयाच्या “खूप जवळ” आहे. हे गाणे मोहम्मद फैजने गायले आहे आणि राजकुमार रावचे चाहते आधीच या गाण्याच्या प्रेमात पडले आहेत.

‘श्रीकांत’ नंतर मे महिन्यात प्रदर्शित होणारा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा रावचा दुसरा चित्रपट आहे. या अभिनेत्याने ‘श्रीकांत’ मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि त्याला बॉलीवूडमधील सर्वात अष्टपैलू कलाकार का मानले जाते हे सिद्ध केले आहे. आता, राजकुमार राव शरण शर्मा दिग्दर्शित या स्पोर्ट्स ड्रामाच्या रिलीजसाठी तयारी करत आहेत. हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय राव ‘स्त्री 2’ मध्ये विक्कीच्या भूमिकेतही दिसणार आहे. त्याचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ही पाइपलाइनमध्ये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज