काय ते रूप अन् काय तो अंदाज! ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरून पुन्हा लीक झाला रणबीर- साईचा लूक! बघाच…

काय ते रूप अन् काय तो अंदाज! ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरून पुन्हा लीक झाला रणबीर- साईचा लूक! बघाच…

Ramayana Pics Leak: 2023 साली ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ऍनिमल’ दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये (Ramayana Movie) दिसणार आहे. रणबीर कपूर आणि सई पल्लवी (Sai Pallavi) यांनी अखेर त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. शनिवारी, नितीश तिवारी (Nitish Tiwari) यांच्या चित्रपटाच्या सेटवरील दोन्ही कलाकारांचे फोटो लीक झाल्याचे पाहायला मिळाले आहे, लीक झालेले फोटो पाहून या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

सेटवरून रणबीर-सई पल्लवीचे फोटो लीक

लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर कपूर रामच्या भूमिकेत मरून रंगाचे धोतर घातलेला दिसत आहे. त्याच्या एका खांद्यावर त्याच रंगाचा स्कार्फ दिसत आहे. त्याने गळ्यात सोन्याचा हार आणि हाताची पट्टीही घातली आहे. लांब केसांनी रणबीर खूपच आकर्षक दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू देखील पाहायला मिळत आहे. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीही खूप सुंदर दिसत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे, तिने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे. तिने खूप भारी पारंपरिक दागिने घातलेले दिसतात. रणबीर आणि सई सध्या वनवासपूर्व सिक्वेन्सचे शूटिंग करत असल्याचे फोटोवरून स्पष्ट झाले आहे.


नितीश तिवारींच्या रामायणच्या सेटवरील फोटो ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाही चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो लीक झाले होते. ज्यात लारा दत्ता आणि अरुण गोविल आपापल्या पात्रांमध्ये दिसत होते. अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये रामची भूमिका साकारून खूप लोकप्रियता मिळवली होती. नितेश तिवारीच्या रामायणमध्ये अरुण गोविल राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहे. लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रभू राम या व्यक्तिरेखेसाठी रणबीरने खूप मेहनत घेतली

याआधी रणबीरला रामच्या भूमिकेसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी कठोर शेड्यूलमधून जावे लागल्याचे वृत्त होते. त्याने कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केले आणि धावणे आणि बॉडीवेट ट्रेनिंगसह कार्डिओ वर्कआउट्स वाढवले आहे.

Sonu Sood: सोनू सूदने ‘या’ कारणांसाठी अरिजित सिंगचे मानले आभार; म्हणाला, ‘जादुई आवाज…’

रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त, यश देखील रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे, तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत सामील झाल्याची माहिती आहे. कुंभकर्ण आणि विभाशनच्या भूमिकांसाठी तो बॉबी देओल आणि विजय सेतुपती यांच्याशीही चर्चा करत असल्याचे बोलले जात आहे. सध्या यासंदर्भात अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube