Sajana Movie : मराठी चित्रपटाचा कलरफुल पॅटर्न : सजना !

Sajana Movie : मराठी चित्रपटाचा कलरफुल पॅटर्न : सजना !

Sajana Movie : ‘सजना’ (Sajana) हा शशिकांत धोत्रे (Shashikant Dhotre) दिग्दर्शित मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला. रोमँटिक ड्रामा, सामाजिक भेदभाव आणि मानवी नातेसंबंधांचे बदलते स्वरूप अशी या सिनेमाची वनलाईन आहे. सुरूवातीला रोमॅंटिक वाटणारा हा सिनेमा उत्तरार्धात प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडतो.

Diogo Jota : दिग्गज फुटबॉल खेळाडूचा कार अपघातात मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह 

प्रेम आणि सामाजिक भेदभावांमुळे निर्माण होणारे संघर्ष हा कथेचा गाभा आहेत. या सिनेमाचे कथानक सजना (आकाश सर्वगोड) आणि वंदना (तृप्ती मोरे) यांच्या नात्याभोवती फिरते. तर दिनेश (संभाजी पवार) ही देखील या सिनेमातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. या सिनेमाचे कथानक सुरुवातीला रोमँटिक  वाटत असले, तरी हे कथानक अनपेक्षित वळणे घेते. भाव-भावना, नात्यांमधली उलथापालथ, संघर्ष आणि विश्वासघात आणि त्यामुळे बदलणार आयुष्य याचं चित्रण या सिनेमात आहे. सिनेमाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की कथा संपली, तेव्हा ती अनपेक्षित वळण घेते आणि प्रेक्षकांचे सुन्न करते.

निवडणुकीत नेमकं कुठं चुकलं, भाजप-काँग्रेसचं साटंलोटं काय? बच्चू कडूंनी सांगितली खरी गोष्ट.. 

जातीभेदांमुळे वाट्याला येणारा संघर्ष या सिनेमात आहे. यापूर्वीही काही मराठी सिनेमांमध्ये जातीसंघर्ष आला, मात्र, त्यांचा शेवट बहुतेकदा नकारात्मक स्वरूपाचा होता. ‘सजना’ यापेक्षा  खूप वेगळा आहे, कारण तो सकारात्मक दृष्टिकोन मांडतो. हा सिनेमा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, याची शिकवण देतो. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव चित्रपटात दिसतो. त्यामुळे हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता न राहता विचारप्रवर्तक ठरतोय.

शशिकांत धोत्रे यांनी दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट काम केलेय. त्यांनी सजनाच्या डायलॉगमधून गावकुसातली भाषा मोठ्या पडद्यावर आणली. ते स्वत: चित्रकार असल्याने त्यांनी प्रत्येक फ्रेम पेंटिंगसारखे साकारली आहे. रणजित माने यांचे छायाचित्रण चित्रपटाला दृश्यात्मक सौंदर्य प्राप्त करून देते.

संगीत हे या सिनेमाचे आणखी एक बलस्थान आहे. या सिनेमातील संगीतामुळे कथानकाला भावनिक जोड मिळाली. नवीन कलाकारांनीही स्क्रीनवर प्रभावी कामगिरी केली आहे.

थोडक्यात, जातीच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रेमाची ताकद दाखवणारा आणि समाजभान शिकवणारा हा चित्रपट प्रत्येक सिनेरसिकाने पाहायलाच हवा.

चित्रपटाचे नाव: सजना
दिग्दर्शक आणि निर्माता: शशिकांत धोत्रे
प्रदर्शन तारीख: २७ जून २०२५
भाषा: मराठी
स्टार – चार स्टार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube