Kakukda: रितेश भाऊचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे

Kakukda: रितेश भाऊचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे

Kakukda OTT Release Time: अभय वर्मा (Abhay Verma) आणि शर्वरी स्टारर (Sharvari Wagh) हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ च्या भव्य यशानंतर, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आता त्याची पुढील हॉरर कॉमेडी ‘काकुकडा’ (Kakukda Movie) घेऊन येत आहेत. या चित्रपटाची खूपच जोरदार चर्चा होत आहे. ‘काकुडा’मध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि साकिब सलीम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक मनोरंजक ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यानंतर ‘काकुडा’ बाबत चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)


‘काकुडा’ ओटीटीवर कधी रिलीज होतोय?

अलीकडेच आदित्य सरपोतदारच्या ‘मुंज्या’ या अलौकिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. कमी बजेट आणि स्टार पॉवर नसलेल्या या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई केली होती. आता आदित्य ओटीटी (OTT ) प्लॅटफॉर्मवर सोनाक्षी आणि रितेश देशमुख अभिनीत ‘काकुडा’ हा आणखी एक हॉरर चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे झहीरसोबतच्या लग्नानंतर सोनाक्षीचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर ‘काकुडा’ कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होतोय हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ‘काकुडा’ 12 जुलै रोजी झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. या हॉरर कॉमेडीचा प्रीमियर आज मध्यरात्री होणार असल्याची माहिती आहे.

काकुडा HD मध्ये कसा बघायचा?

ZEE5 वर HD फॉरमॅटमध्ये ‘काकुडा’ पाहण्यासाठी, तुम्हाला मासिक/वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅनसह ZEE5 वर साइन अप करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, नवीन प्रकाशन विभागात काकुडा शोधा किंवा शोध बारमध्ये शोधा. ‘काकुडा’ वर क्लिक करा आणि HD मध्ये चित्रपट पहा. डाऊनलोड ऑप्शनच्या मदतीने तुम्ही एचडी फॉरमॅटमध्येही चित्रपट डाउनलोड करू शकता.

Ritesh Deshmukh : ‘काका नेहमीच पाठिशी उभे राहिले’, काका-पुतण्याचं नातं रितेशचं वक्तव्य चर्चेत

काय आहे ‘काकुडा’ची कथा?

काकुडा ही रातोडी गावातील सनी (साकिब सलीम) आणि इंदिरा (सोनाक्षी सिन्हा) या नवविवाहित जोडप्याची कथा आहे, ज्यांना त्यांच्या लग्नाच्या रात्री चुकून काकुडाच्या शापाचा सामना करावा लागतो. शापानंतर सनीचा जीव धोक्यात असताना इंदिरा भूत शिकारी व्हिक्टर (रितेश स्टार) ची मदत घेते. चित्रपटात अनेक अलौकिक घटना घडताना पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज