Sam Bahadur Trailer Out: ‘दुश्मनाचा थरकाप उडवणारा ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

  • Written By: Published:
Sam Bahadur Trailer Out: ‘दुश्मनाचा थरकाप उडवणारा ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Sam Bahadur Trailer Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या हिंदी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Sam Bahadur Trailer Out) या ट्रेलरमध्ये विकीचा एकदम हटक्या अंदाजात अभिनय चाहत्यांना बघायला मिळाला आहे. दुश्मनाचा थरकाप उडवणारा सॅम बहादुर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विकीचा खास लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सर्वच गोष्टी चाहत्यांना घायाळ करून ठेवले आहेत. सॅम बहादुर या सिनेमामध्ये विकीनं सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांची मुख्य भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


“एक सोल्जर के लिए उसरी जान से ज्यादा कीमती होती है उसकी इज्जत…. और एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है.” हा विकीचा धमाकेदार डायलॉग टीझरच्या सुरुवातीला ऐकायला मिळत आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांची देखील एक झलक सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.

फातिमा सना शेखनं सॅम बहादुर या सिनेमात इंदिरा गांधी यांची मुख्य साकारली आहे, तर सान्या मल्होत्रानं सॅम माणेकशॉ यांच्या बायकोची सिल्लू माणेकशॉ यांची मुख्य भूमिका साकारली आहे. विकीनं सोशल मीडियावर (Social media) सॅम बहादुर या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. विकीनं सोशल मीडियावर टीझरला कॅप्शन दिलं आहे की, “जिंदगी उनकी. इतिहास हमारा. या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींना देखील हा टीझर खूपच आवडला आहे, त्यांनी विकीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

Fauj The Battle Of Hile: ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्य दलाची शौर्यगाथा

अर्जुन कपूर, वरुण धवन यांनी टीझरला कमेंट करुन विकीला त्याच्या या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत असल्याचे बघायला मिळाले आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. मेघना गुलजार यांनी देखील सॅम बहादुर सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. विकीच्या या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंग बुंदेला या कलाकारांनी देखील या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube