‘फतेह’च्या सेटवरून Sonu Sood शेअर केले नसीरुद्दीन शाहसोबतचे खास बीटीएस फोटो

Sonu Sood ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर BTS फोटो शेअर केले आहेत ज्यात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत स्क्रिप्ट वाचन सुरू आहे.

'फतेह'च्या सेटवरून Sonu Sood शेअर केले नसीरुद्दीन शाहसोबतचे खास बीटीएस फोटो

Sonu Sood share BTS photo with Nasiruddin Shah from Fateh set : अभिनेता, दिग्दर्शक सोनू सूद ( Sonu Sood ) अभिनीत फतेहची ( Fateh ) भूमिका आता अधिक मनोरंजक बनली आहे आणि याला कारण देखील तितकच खास आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर BTS फोटो शेयर केले आहेत ज्यात ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ( Nasiruddin Shah ) यांच्यासोबत स्क्रिप्ट वाचन सुरू आहे.

चाहत्यांच्या लाडक्या अर्चनाला इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षे पूर्ण! अंकीताने शेअर केली खास पोस्ट

सोनू सोशल मीडिया वर फोटो टाकून केप्शन लिहितो “नासीर सर ज्यांच मी आयुष्यभर कौतुक केले आहे त्यांचा सोबत काम करून चित्रपटाचं दिग्दर्शन करणे खूप खास होत ” यापूर्वी अशी बातमी आली होती की दिग्गज अभिनेता आगामी सायबर क्राइम थ्रिलरमध्ये हॅकरच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूदच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात त्याची भूमिका खास आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदने यापूर्वी नसीरुद्दीन शाहच्या या चित्रपटाशी संबंध असल्याची पुष्टी केली होती आणि म्हटले होते की अभिनेता “अभूतपूर्व भूमिकेत” दिसणार आहे. सूदने यापूर्वी म्हटले आहे की ‘फतेह’ हा एक ॲक्शनर आहे जो हॉलीवूडच्या कलाकारांच्या बरोबरीने असेल, तर स्टार कास्टमध्ये शाहच्या समावेशामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि उत्साह वाढला आहे.

पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार! शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर ट्विट करत म्हणाले…

सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राइमच्या वास्तविक जीवनातील घटनांचा अभ्यास करेल. यात जॅकलीन फर्नांडीझची देखील भूमिका आहे आणि यावर्षी चित्रपटगृहात झळकणार आहे.

follow us