Jhanak : सशक्त स्त्री व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या ‘झनक’ मालिकेची झलक!

Jhanak : सशक्त स्त्री व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या ‘झनक’ मालिकेची झलक!

Jhanak : ‘स्टार प्लस’ची नवी मालिका ‘झनक’चा (Jhanak)रंजक प्रोमो सोशल मीडियावर (Social Media)रिलीज करण्यात आला आहे. झनकच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यावर ती कशी मात करते? यांवर ही मालिका प्रकाश टाकणार आहे. आगळावेगळा कंटेंट देण्यासाठी आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या विषयांना हात घालण्यात ‘स्टार प्लस’ वाहिनीचा हातखंडा आहे. झनक ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील नवी मालिका आहे. या मालिकेमध्ये मोठी आशा आणि स्वप्नं बाळगणाऱ्या एका हुशार तरुण मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.

बर्थडे बॉय किंग कोहलीचे शानदार शतक! सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांशी बरोबरी

त्या गरीब मुलीच्या आयुष्यामध्ये अचानक उद्भवलेली परिस्थिती पाहताना प्रेक्षक निश्चितच या कथेत गुंतून राहणार आहे. मालिकेतील ‘झनक’ ही मुख्य व्यक्तिरेखा हिबा नवाब हिने साकारली आहे. क्रिशल आहुजा या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहे.

नुकताच झनकच्या निर्मात्यांनी मालिकेचा हृदयस्पर्शी ‘प्रोमो’ प्रदर्शित केला आहे. एका वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आयुष्यातील संघर्ष करणाऱ्या मुलीचा प्रवास या ‘प्रोमो’मध्ये प्रेक्षकांसमोर उलगडत जातो. झनक तिच्या दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना कशी नेटाने करते? याची पहिली झलक या ‘प्रोमो’त पाहायला मिळत आहे. झनकच्या कुटुंबावर अचानक झालेल्या आघाताने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. याचवेळी झनकला मदतीचा हात देणाऱ्या अनिरुद्धची या मालिकेत एन्ट्री होते.

हिटमॅन रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग; एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाची बरोबरी

कितीतरी वेळा झनक आणि अनिरुद्ध परस्परांच्या समोर येतात, पण त्यांची भेट होत नाही. मात्र, नशीब पुन्हा या दोघांना एकाच घरात एकत्र आणते. वंचित पार्श्वभूमीतून आलेली असूनही झनक तिच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी कशी उभी राहते आणि तिचे प्रेम तिचा स्वीकार करते का? या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिका पुढे सरकेल, तशी मिळत जातील. झनकची कथा प्रेक्षकांकरता भावनेने ओथंबलेली असंख्य वळणे घेणारी ‘रोलरकोस्टर’ सफर आहे आणि झनक एका फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून पुन्हा जन्म कसा घेते, याचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येईल.

‘स्टार प्लस’ वरील मालिकांमधून महत्त्वाकांक्षी स्त्री पात्रांचे जे चित्रण करण्यात आले, त्याला आजमितीस प्रेक्षकांची मोठी वाहवा मिळाली आहे. देशातील महिलांकरता या मालिकांमधील या खंबीर स्त्री व्यक्तिरेखा ठोस आदर्श ठरतात. ‘झनक’ मालिकेद्वारेही, ‘स्टारप्लस’ने हा वारसा जपत, ‘झनक’ ही अशीच एक सशक्त स्त्री व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर अनोख्या पद्धतीने आणण्याची योजना आखली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube