वाल्मिक कराडचं मुख्य सूत्रधार! सुटका नाही; धनंजय मुंडेंना क्लीन चिट, आमदार धस काय म्हणाले?

Suresh Dhas on Walmik karad : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने दोषमुक्तीचा आरोप फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडला दोषमुक्ती न देण्यामागे काही निरीक्षणे नोंदवली. (karad) वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हणटलंय. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरुश धस यावर बोलताना म्हणाले, हे प्रकरण अगदी राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जासाठी गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं आहे. हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही असं आमदार धसर यावेळी म्हणालेत. दोन्ही आका हे शोलेच्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच काटा पण हेच असं म्हणत धस यांनी यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच नाव न घेता तेही यात आहेत असं वक्तव्य केलं आहे. तसंच, धमक्या देणं, खंडणी वसूल करणं याची आकाला सवयच लागली होती. आवादा कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं असा थेट वार धसांनी केलाय.
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती, बाळा बांगर यांचा गंभीर आरोप
या घटनेनतर कोर्टानं दोन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आलं. ही खंडणी वसूल करताना त्यात संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केला आहे. ही गोष्ट माननीय न्यायालयाच्या लक्षात आली आहे. मारायला आलेले लोक यांचेच आहेत. वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हणटलंय. दोषमुक्तीचा अर्ज या केसमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला. केस लांबवण्याचे प्रयत्न झाले. मकोका कोर्टानं नोंदवलेलं महत्वाचं निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचं म्हटलंय असंही धस म्हणालेत.
‘दोन्ही आका शोलेतल्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच आणि काटा पण हेच. कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणांमध्ये प्रमुख सुत्रधार, मेन गँगस्टर, मास्टरमाईंड असे सगळे शब्द वापरले आहेत. धनंजय मुंडेंनी जो दावा केला होता तोच न्यायालयानं खोडून काढला. धनंजय मुंडेंना एकाच खरेदीत क्लीन चिट मिळालीय. धनंजय मुंडेंना मिऴालेल्या क्लीन चिट विरोधात मी स्वतः सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रयत्न करणार’ असल्याचंही आमदार धस यावेळी म्हणालेत. त्यामुळे पुन्हा एकदा धस आणि मुंडे संघर्ष पाहायला मिळणार असं सध्याचं चित्र आहे.