होळी पार्टीत सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत छेडछाड, अभिनेत्याविरोधात झाला गुन्हा दाखल

Co Actor Misbehave With Tv Actress : होळी पार्टी दरम्यान सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत छेडछाड करण्यात आली आहे. मुंबईतील अंबोली पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Actor ) देशभरात 14 मार्च 2025 रोजी होळीचा सण साजरा करण्यात आला, होळीनिमित्त ठिकठिकाणी होळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. अशाच एका पार्टीमध्ये सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत गैरवर्तन झाल्याची माहिती मिळत आहे.
सोनम एडिटर-इन-चीफ च्या भूमिकेत; डिओरच्या नवीन डी-जर्नी बॅगच्या अनावरणासाठी फिल्म पैरोडीमध्ये सामील
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं अंबोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन, छेडछाडीचा प्रकार घडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या आरोपांनंतर पोलिसांनी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याविरोधात बीएनएसच्या कलम 75(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुकीचा स्पर्श केला
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितलं की, याप्रकरणी अभिनेत्रीनं ज्या अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत, त्या अभिनेत्याचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. अभिनेत्यावर होळी पार्टीत अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आणि तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेलिव्हिजन अभिनेत्री 29 वर्षांची आहे. तिनं अनेक टेलिव्हिजन सीरिअल्स आणि मिनी सीरीजमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री एका एन्टरटेन्मेट चॅनलसोबत काम करत आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे.
कथितरित्या नशेत होता को-अॅक्टर
अभिनेत्रीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, तिच्या कंपनीनं छतावर होळी पार्टी आयोजित केली होती. 30 वर्षीय को-अॅक्टरही त्या होळी पार्टीत उपस्थित होता. तो दारूच्या नशेत होता. पुढे बोलताना ती म्हणाली की, तो माझ्यावर आणि पार्टीत उपस्थित असलेल्या इतर महिलांवर रंग फेकण्याचा प्रयत्न करत होता.
मला त्याच्यासोबत होळी खेळायची नव्हती, म्हणून मी विरोध केला आणि त्याच्यापासून दूर गेले. मी टेरेसवरील पाणीपुरीच्या स्टॉलच्या मागे गेले, पण तो माझ्या मागे आला आणि माझ्यावर रंग फेकू लागला. मी माझा चेहरा झाकला, पण त्यानं मला जबरदस्तीनं धरलं आणि माझ्या गालावर रंग लावला. त्यानं मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. मी त्याला ढकललं. मला मानसिक धक्का बसला आणि मी थेट वॉशरूममध्ये गेले.