नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी WhatsApp कडून खास फीचर्सची भेट; नवीन स्टिकर्ससह स्टेटसमध्ये बदल

नवीन स्टिकर्स, व्हिडिओ कॉल इफेक्ट्स आणि स्टेटस टूल्समुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं अधिक खास आणि मजेशीर होणार.

  • Written By: Published:
Untitled Design (180)

WhatsApp presents special features to welcome the New Year : नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने(Whatsapp) आपल्या कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी 2026 शी संबंधित काही खास आणि आकर्षक फीचर्स लाँच केले आहेत. मेटा (Meta) कंपनीच्या माहितीनुसार, नवीन वर्षाचा दिवस हा WhatsApp साठी वर्षातील सर्वात व्यस्त दिवस असतो, ज्या दिवशी संदेश आणि कॉल्सचे जागतिक विक्रम मोडले जातात. हीच बाब लक्षात घेऊन कंपनीने यंदा नवीन स्टिकर्स, व्हिडिओ कॉल इफेक्ट्स आणि स्टेटस टूल्स सादर केले आहेत, ज्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं अधिक खास आणि मजेशीर होणार आहे.

नवीन वर्षी WhatsApp सर्वाधिक सक्रिय का असते?

व्हॉट्सॲपच्या आकडेवारीनुसार, सामान्य दिवसांत जगभरात दररोज 100 अब्जांहून अधिक मेसेजेस आणि सुमारे 2 अब्ज कॉल्स होतात. मात्र, नवीन वर्षाच्या दिवशी हा आकडा लक्षणीयरीत्या वाढतो. वेगवेगळ्या देशांमध्ये आणि टाइम झोनमध्ये राहणारे लोक या दिवशी मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांशी संपर्क साधतात. या प्रचंड ट्रॅफिकचा विचार करून WhatsApp दरवर्षी नवीन वर्षासाठी खास फीचर्स सादर करत असते.

व्हिडिओ कॉलमध्ये फटाके आणि कॉन्फेटीची धमाल

2026 च्या अपडेटमध्ये WhatsApp ने व्हिडिओ कॉलिंग अनुभव अधिक रंगतदार केला आहे. आता व्हिडिओ कॉल दरम्यान फायरवर्क्स, कॉन्फेटी आणि स्टार्ससारखे इफेक्ट्स स्क्रीनवर दिसतील. यासोबतच, 2026 साठी खास डिझाइन केलेला नवीन स्टिकर पॅक देखील लाँच करण्यात आला आहे, जो वैयक्तिक चॅट्स आणि ग्रुपमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरता येईल. कन्फेटी इमोजीवर रिएक्शन दिल्यास चॅटमध्ये विशेष अ‍ॅनिमेशनही दिसणार आहे.

पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत जाणार? ‘आघाडी झाली याचा अर्थ…’ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

स्टेटस आणि ग्रुप चॅटसाठी नवे टूल्स

WhatsApp ने पहिल्यांदाच स्टेटससाठी ॲनिमेटेड स्टिकर्स सादर केले आहेत. वापरकर्ते आता 2026 थीम असलेल्या लेआउट्ससह आपला स्टेटस शेअर करू शकतात. यासोबतच, ग्रुप चॅटमध्ये नवीन वर्षाची पार्टी किंवा कार्यक्रम प्लॅन करण्यासाठी इव्हेंट तयार करणे, ते पिन करणे आणि RSVP घेणे अशी फीचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोल्सच्या माध्यमातून जेवण किंवा अ‍ॅक्टिव्हिटीज ठरवता येतील, तसेच लाईव्ह लोकेशन शेअर करून सर्वांना ठिकाणी पोहोचणे सोपे होणार आहे.

2026 मध्ये WhatsApp मध्ये मोठे बदल अपेक्षित

WhatsApp च्या बीटा अपडेट्सवरून संकेत मिळत आहेत की 2026 हे वर्ष प्लॅटफॉर्मसाठी मोठ्या बदलांचे ठरणार आहे. यामध्ये Meta AI-सक्षम ‘Imagine Tools’ चा समावेश असणार असून, त्याद्वारे वापरकर्ते स्टेटस फोटोंमधील ऑब्जेक्ट्स संपादित करणे, ॲनिमेट करणे किंवा काढून टाकणे शक्य होईल. याशिवाय, युजरनेम रिझर्वेशन सिस्टमवरही काम सुरू असून, यामुळे फोन नंबरवरील अवलंबित्व कमी होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, प्रगत चॅट क्लिअरिंग आणि अधिक कडक अकाउंट सिक्युरिटी मोडसारखी फीचर्सही येण्याची शक्यता आहे.

follow us