शहरात राहायचं असेल तर कारमध्येच मुक्काम करा.. ‘या’ शहरात घरांचा प्रचंड दुष्काळ, प्रस्तावाला विरोध

शहरात राहायचं असेल तर कारमध्येच मुक्काम करा.. ‘या’ शहरात घरांचा प्रचंड दुष्काळ, प्रस्तावाला विरोध

California City : कॅलिफोर्निया अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि चमकदार राज्यांत गणले जाते. पण याच झगमगाटामागे (California) एक कटू सत्य देखील लपलं आहे. या शहरात राहणे आता आवाक्याबाहेर गेले आहे. विद्यार्थ्यांना चक्क कारमध्ये राहणे भाग पडले आहे. कारण येथील घरांत राहणेच शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हॉस्टेल किंवा अपार्टमेंटचे भाडे देणे विद्यार्थ्यांना आजिबात शक्य नाही. परिस्थिती इतकी भीषण आहे की क्लास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चक्क कारमध्ये राहावे लागत आहे. या सत्य परिस्थितीकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

संकटात धक्कादायक प्रस्ताव

शहरातील या गंभीर परिस्थितीचा विचार करून डेमोक्रॅटिक असेम्ब्ली मेंबर कोरी जॅक्सन यांनी एक आश्चर्यजनक प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये म्हंटले आहे की कॅलिफोर्नियातील सर्व कम्युनिटी कॉलेज आणि राज्य विद्यापीठांना एक सेफ पार्किंग प्रोग्राम सुरू करण्याची आवश्यकता आहे. या अंतर्गत बेघर विद्यार्थी रात्रीच्या वेळी कॉलेज कॅम्पसमध्ये आपल्या कार पार्क करून यात सुरक्षितपणे झोपू शकतील.

आता हा प्रस्ताव कायम स्वरूपाचा उपाय म्हणून अमलात आणता येणार नाही. पण सध्याच्या संकटात हा एक आवश्यक निर्णय आहे. आकडेवारीनुसार प्रत्येक चार पैकी एक विद्यार्थी गेल्या एक वर्षांपासून बेघर आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बदलले! इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ लावणारच

कॉलेज प्रशासनाचा आक्षेप, विद्यार्थ्यांना अपेक्षा

कॉलेज प्रशासनाकडून जॅक्सन यांच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला जात आहे. यासाठी प्रशासनाकडे पुरेसा निधी नाही तसेच या योजनेतून दीर्घकालीन आवास संकटाचे समाधान मिळत नाही. पण जॅक्सन यांचे म्हणणे आहे की प्रत्येक एजन्सीने थोडी थोडी मदत केली तरी परिस्थिती सुधारू शकते.

या प्रस्तावाला विद्यार्थी नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. स्टूडेंट सिनेट फॉर कॅलिफोर्निया कम्युनिटी कॉलेजचे प्राचार्य इवान हर्नांडेज यांनी सांगितले की प्रस्तावामुळे कोणतीही नवी समस्या निर्माण होणार नाही. आधीची जी समस्या आहे त्याकडे सर्वांचे लक्ष वाढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

कारच बनलं घर, पायलट प्रोजेक्टची चर्चा

लाँग कम्युनिटी कॉलेजने सन 2021 मध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. 70 विद्यार्थी कारमध्ये राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कॉलेजने एक सुरक्षित पार्किंग योजना सुरू केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना बाथरूम, शॉवर, वायफाय यांसारख्या सुविधा देण्यात आल्या होत्या. या योजनेत आतापर्यंत 36 विद्यार्थी सहभागी झाले. या योजनांच्या बाबतीत अजूनही पैशांची कमतरता आणि प्रशासकीय आव्हाने आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही तोपर्यंत असे लहान लहान निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.

काय सांगता! वादळाच्या भीतीनं शाळा, कॉलेज अन् रेल्वे बंद; वाचा, कुठं ओढवलयं संकट?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube