मित्र असो की शत्रू, ट्रम्प यांच्या टॅरिफ समोर सगळेच हतबल; 50 देशांना घेतला ‘हा’ निर्णय

Donald Trump Reciprocal Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) रेसिप्रोकल टॅरिफच्या निर्णयाने जगभरात (Reciprocal Tariff) खळबळ उडाली आहे. जागतिक बाजारपेठेवर या निर्णयाचा अतिशय प्रतिकूल परिणाम झाला आहे. या निर्णयाने वित्तीय बाजारांत मोठी उलथापालथ झाली आहे. जागतिक मंदीची भीतीही व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देश संभ्रमात पडले आहेत. जगभरातील 50 पेक्षा जास्त देशांनी ट्रम्प प्रशासनाशी संपर्क साधून चर्चा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये चीन, इस्राएल, इटली यांसारख्या देशांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयांसह अन्य धोरणाचा देशात नागरिक तीव्र विरोध करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत ठिकठिकाणी लोकांनी निदर्शने केल्याचे दिसून आले. देशात काही ठिकाणी अजूनही निदर्शने सुरू आहेत. निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलक करत आहेत. परंतु, डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयांवर ठाम आहेत. काही वेळेस कडू औषध द्यावे लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.
व्यापार युद्ध भडकणार! अमेरिकेकडून चीनवर मोठा टॅरिफ बॉम्ब; 9 एप्रिलपासून 104 टक्के आयात शुल्क
जगभरात खळबळ पण ट्रम्प एकदम कुल
ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेन्सेट यांनी स्पष्ट केले की चुकीच्या व्यापार पद्धती हा काही असा मुद्दा नाही की जो काही दिवसांत सोडवता येईल. दुसऱ्या देशांकडून काय प्रस्ताव दिले जातात आणि ते किती विश्वासार्ह आहेत याचा विचार अमेरिकेकडून केला जाईल. अमेरिकेने इस्राएलवर 17 टक्के (Israel) टॅरिफ आकाराला आहे. व्हिएतनाम सरकारने सांगितले की जर वाटाघाटी व्यवस्थित झाल्या तर आमच्याकडून आम्ही टॅरिफ शून्य करून टाकू. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलीनी यांनी मात्र देशातील उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करू असे सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे काही खासदार मात्र काळजीत पडले आहेत. नेब्रास्कामधील रिपब्लिकन खासदार डॉन बेकन यांनी एक नवीन बिल आणण्याची घोषणा केली आहे. ज्याद्वारे टॅरिफवर राष्ट्रपतींचे अधिकारी मर्यादित करता येतील.
चीनवर तब्बल 104 टक्के टॅरिफ
डोनाल्ड ट्रम्प जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. अगोदरच चीनवर 34% टॅरिफ लादलेल्या अमेरिकेने आता चीनवर पन्नास टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. तसेच युरोपीय संघाने देखील 25% डायरेक्टचा प्रस्ताव ठेवला आहे.
ज्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती देखील थेट प्रति बॅरल 60 डॉलरवर आले आहेत. ज्यामुळे जग मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. तसेच व्यापार युद्ध भडकण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर थेट 104 टक्के टॅरिफ आकारण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. ज्यामुळे चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जगाला झटका देणाऱ्या ट्रम्पकडून दिलासा! ब्राझीलसह ‘या’ देशांवरील टॅरिफ घेतला मागे