मिथेनॉल अति प्रमाणात असलेले सॅनिटायझर घातक, यूएस एफडीएने दिला न वापरण्याचा सल्ला
नवी दिल्ली : विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण सतत सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर करत असतो. हे सॅनिटायझर आपल्याला विषाणूपासून वाचवतं असले तरी ते आपल्या शरीरीरावर मोठे परिणाम करत असतात. आता यूएस एफडीएने (US FDA) काही प्राणघातक सॅनिटायझऱ न वापरण्याचा सल्ला दिला.
एक-दोन नव्हे तब्बल 14 वर्षांनंतर अभिनेत्याचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; म्हणाला, ‘माझ्या वयाचे…’
काही सॅनिटाझरमध्ये मिथेनॉलचे अधिक प्रमाण असल्यानं यूएस एफडीएने सॅनिटायझर बाजारातून परत मागवले आहेत.
5 एप्रिल रोजी अन्न आणि औषध प्रशासनाने जाहीर केले की, अरुबा ॲलो हँड सॅनिटायझर जेल अल्कोहोल 80% आणि अरुबा ॲलो अल्कोहोलाडा जेल यात असलेल्या मिथेनॉलमुळे ते सॅनिटायझर परत मागवण्यात आले. हे सॅनिटायझर प्रोडक्ट यूएसमध्ये ऑनलाइन विकली जात होती. मे 2021 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान हे सॅनिटायझर प्रोडक्ट वितरित केली गेली. युसएस एफडीएने सांगितले की, हे सॅनिटायझर घातक असून ते खाल्ल्यास त्वचेच्या समस्या, अंधत्व आणि अगदी कोमाचा धोका होऊ शकतो.
FDA : मिथेनॉलचे अधिक प्रमाण असलेले सॅनिटायझर आरोग्यासाठी घातक
तर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, मिथेनॉल शरीरात गेल्यास किंवा त्याचा डोळा, त्वचेशी आल्यास गंभीर आजार होऊ शकतात. जर सॅनिटाझर सेवन केले गेले तर मळमळ, डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंड निकामी होणे, कायमचे अंधत्व येणे, कोमा, मृत्यूही होऊ शकते. FDA नुसार, त्यांची त्वरित विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
सुरक्षित सॅनिटायझर कसे निवडावे?
डॉक्टरांना सांगितले की, FDA ने ग्राहकांना मिथेनॉलचे अधिक प्रमाण असलेले काही हँड सॅनिटायझर उत्पादनांचा वापर न करण्याचे आवाहन केले. अगदी कमी डोसमध्ये मिथेनॉल प्राणघातक ठरू शकते: 2 चमचे (30 मिलीलीटर) मिथेनॉलचे सेवन लहान मुलासाठी घातक ठरू शकते आणि 2 ते 8 औंस (60 ते 240 मिलीलीटर) प्रौढ व्यक्तीसाठी प्राणघातक असू शकते.
सॅनिटायझर खरेदी करण्यापूर्वी सॅनिटाझरचा ब्रँड, निर्माता, वितरक आणि
NDC किंवा राष्ट्रीय औषध कोड क्रमांक पाहूनच खरेदी करावा असा सल्ला एफडीएने दिला.
सॅनिटायझर सुरक्षितपणे वापरण्यासाठी टिप्स-
अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा ज्यात 60% अल्कोहोल असेल.
सॅनिटायझर नंतर हात डोळ्यांना किंवा संवेदनशील भागाला लावू नका.
सॅनिटायझर मुलांपासून दूर ठेवा.