Air Accident : फक्त रईसीच नाही, जगातील ‘या’ टॉप नेत्यांचाही विमान अपघातात मृत्यू..

Air Accident : फक्त रईसीच नाही, जगातील ‘या’ टॉप नेत्यांचाही विमान अपघातात मृत्यू..

Air Accident : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा (Ebrahim Raisi) हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. रईसीबरोबर विदेश मंत्री सुद्धा या अपघातात ठार झाले. या अपघाताची जगभरात चर्चा होत आहे. यानिमित्ताने जगभरातील नेत्यांचे विमान अपघातांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात याआधीही अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे. जगातील या विमान अपघातांची माहिती घेऊ या..

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव राहिलेले डग हॅमरस्कॉल्ड 18 सप्टेंबर 1961 या दिवशी विमान अपघातात मारले गेले होते. जांबिया देशात या विमानाचा अपघात झाला होता. या घटनेत 16 लोकांचा मृत्यू होता. पनामाचे राष्ट्रपती उमर टोरीजोस यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. 31 जुलै 1981 रोजी त्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या विमानाला आग लागली होती. या घटनेचा खुलासा दुसऱ्या दिवशी झाला होता. परंतु अपघात नेमका कुठे झाला त्या ठिकाणाची माहिती होण्यात बराच काळ लागला.

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून वादग्रस्त कार्यकाळ! वाचा, कोण होते कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे उपाध्यक्ष लिन बियाओ यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. चीनमध्ये जपानी आणि राष्ट्रवाद्यांच्या विरोधातील संघर्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मोजांबिकचे राष्ट्रपती समोरा मचेल यांचा मृत्यू 19 ऑक्टोबर 1986 रोजी एका विमान अपघातात झाला होता. या अपघातात आणखी 34 जण मृत्यूमुखी पडले होते तर 10 जण मात्र बचावले. मृत्युमुखी पडलेल्यांत मोजांबिक सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सिरियाचे राष्ट्रपती हाफिज अल असद यांचा मृत्यू विमान अपघातात झाला होता. सन 2000 मध्ये राजधानी दमिश्क जवळ हा अपघात झाला होता. या अपघाताकडे अजूनही सीरियात एक षडयंत्र म्हणून पाहिले जाते.

मोठी बातमी! इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघात मृत्यू, इराणला मोठा धक्का

फिलिपिन्सचे सातवे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे 17 मार्च 1957 रोजी विमान अपघातात जीव गमावून बसले. मॅगसेसे भ्रष्टाचार विरोध आणि लोकाभिमुख योजनांमुळे लोकप्रिय होते. सेबू शहरातील माऊंट मानुंगगल भागात या विमानाला अपघात झाला. या विमानात 25 प्रवासी होते त्यातील फक्त एक जण बचावला.

16 जून 1958 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती नेरू रामोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. रामोस क्रूजेइरो डो सुल एअरलाईनवर यात्रा करत असलेल्या पराना राज्यात कुर्टीबा अफोंसो पेना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा मृत्यू एका विमान अपघातात झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज