निवडणुकीतील पराभवामुळे पंतप्रधानांच्या खुर्चीवर संकट; जपानचे पीएम इशिबा देणार राजीनामा

Shigeru Ishiba

Japan PM Shigeru Ishiba Resigns PM Post : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीत फूट पडू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, इशिबा यांनी पंतप्रधानपद सांभाळून एक वर्षही झालेले नाही. जुलै महिन्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता. यानंतर इशिबा यांनी राजीनामा देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असला तरी कधी देणार याबाबत काहीही स्पष्टता नाही.

मागील वर्षातील ऑक्टोबर महिन्यात इशिबा यांनी पंतप्रधान पदाचा (Shigeru Ishiba) कार्यभार स्वीकारला होता. मागील एक महिन्यापासून मात्र पक्षात (Japan PM News) धुसफूस वाढली होती. जुलै महिन्यात झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळवता आलं नाही. यानंतर त्यांच्या पक्षात नाराजी वाढली होती. इशिबा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर इशिबा यांनी वातावरणाचा अंदाज घेत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

जपानमध्ये नवा नियम! दिवसातून फक्त 2 तासच स्मार्टफोन वापरता येणार

राजीनामा मंजूर होणार का? 

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेतृत्वाच्या संदर्भात सोमवारी निवडणुका होणार होत्या. यावर काही निर्णय होण्याच्या एक दिवस आधीच इशिबा यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता जर त्यांच्या राजीनाम्याला मंजुरी मिळाली तर एक प्रकारे हा त्यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्तावच ठरेल. परंतु, फक्त निवडणुकीत पराभव झाला म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत याचा खुलासा अजून झालेला नाही.

इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर जपानमध्ये राजकीय अनिश्चितता निर्माण होणार आहे. जोपर्यंत एलडीपी नवीन नेतृत्व निवडत नाही तोपर्यंत ही अनिश्चितता कायम राहणार आहे. यातच आता अनेक खासदार पंतप्रधानपदासाठी तयारी करत आहेत. स्वतःला प्रोजेक्ट करत आहेत. परंतु, कोणत्याही खासदाराला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी कमीत कमी 20 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

जपानचा अमेरिकेला दणका! अब्जावधी रुपयांची मोठी डील थांबवली; मोदींच्या जपान भेटीचा इफेक्ट?

पक्षाचा नेता निवडल्यानंतरही उमेदवाराला पंतप्रधान होण्यासाठी संसदीय मते मिळवावी लागतील. आता एलडीपीच्या नेतृत्वातील आघाडीने बहुमत गमावलं आहे. तरीही खालच्या सभागृहात त्यांच्या पक्षाचा दबदबा आहे. यामुळे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे परंतु, जिंकण्याची हमी मात्र देता येत नाही. एलडीपीच्या पुढील नेत्यासाठी पाठिंबा मिळवणे हा सर्वात महत्वाचा भाग राहील. इशिबा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यावेळी सुद्धा पक्षाकडे बहुमत नव्हतं. त्यामुळे सन 1955 मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा एलडीपीला आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube