भारतानंतर ‘चीन’चाही मालदीवला दणका; चिनी पर्यटक रोडावले; कारण काय ?

भारतानंतर ‘चीन’चाही मालदीवला दणका; चिनी पर्यटक रोडावले; कारण काय ?

Maldives News : भारत आणि मालदीवचा वाद अजूनही मिटलेला नाही. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

आता मालदीवमध्ये येणारे सर्वाधिक पर्यटक चीन, रशिया, ब्रिटन, इटली आणि जर्मनीचे आहेत. भारतीयांनी बहिष्कार टाकल्यानंतर चिनी पर्यटकांची संख्या वाढली होती. पण आता चिनी पर्यटकही रोडावले आहेत. फेब्रुवारी महिन्यात 33 हजार 897 चिनी पर्यटक मालदीवला आले होते. तर मार्च महिन्यात ही संख्या निम्म्यापेक्षाही कमी होऊन फक्त 13 हजार 609 वर आली आहे.

India Maldives : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी, कर्मचाऱ्यांची एन्ट्री; नवा प्लॅन काय?

इमिग्रेशन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रशियन पर्यटक सर्वाधिक येत आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार 1 लाख 94 हजार 222 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20 हजार 708 पर्यटकांची वाढ आहे. 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत मालदीवमध्ये पर्यटकांची संख्या 6 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मालदीव मीडिया अधाधूच्या रिपोर्टनुसार, देशाच्या इतिहासात कोणत्याही तिमाहीत पर्यटकांची ही सर्वात मोठी वाढ आहे.

चिनी पर्यटक रोडावले

मागील महिन्यात रशियातून सर्वाधिक पर्यटक आले होते. तरीही वर्षभरात पर्यटकांच्या संख्यत चिनी पर्यटक पहिल्या क्रमांकावर राहिले. तर रशियाचा क्रमांक दुसरा राहिला. यानंतर युके, इटली आणि जर्मनी या देशांचा क्रमांक आहे. मार्च महिन्यात जर्मनीतून 21 हजार 176, इटलीतून 18 हजार 897 आणि चीनमधून 13 हजार 609 पर्यटक मालदीवला आले होते.

2024 बद्दल सांगितले तर 8 एप्रिलपर्यंत चिनी पर्यटकांची संख्या 71 हजार 136 होती. रशिया 65 हजार 598 पर्यटकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्यावेळी चीनला भेट दिली तेव्हा पर्यटकांची संख्या वाढली होती. परंतु आता चिनी पर्यटक का कमी झाले, यामागे काय कारण आहे याचे उत्तर अजून तरी मिळालेले नाही.

मालदीवचा पर्यटन उद्योग संकटात! भारतीय पर्यटकांनी फिरवली पाठ, पर्यटन संख्येत ३३ टक्के घट

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज