स्वातंत्र्यावेळी 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनलेले सेंगोल आता नवीन संसद भवनात स्थापित केले जाणार आहे. यामुळे सेंगोल सारखा इतका महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा, जो विस्मरणात गेला होता, त्याचे महत्त्व आता देशाला समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सेंगोलबाबत माहिती दिली. तसेच त्याचे महत्त्व सांगितले. (Noted classical dancer Padma Subrahmanyam wrote […]
Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत केले. त्यांच्या या स्वागतावर विरोधी पक्ष काँग्रेसने खोचक टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले की सरकारने देशातून पळून गेलेल्या नीरव मोदी आणि ललित मोदी यांना जर सरकारने परत आणले तर काँग्रेसचे नेते सुद्धा पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असतील. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा […]
Ministry of Finance Launch Special Rs 75 Coin : एकीकडे दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे नव्या संसदेच्या उद्घटनावरूनदेखील वादाला तोंड फुटलेले असतानाच आता मोदी सरकारकडून देशाची नवी संसद नागरिकांना खिशात घेऊन फिरता येणार आहे. येत्या 28 मे रोजी नव्या संसदेच्या उद्धटनाप्रसंगी मोदी सरकारकडून 75 रुपयांचे अनोखे नाणे […]
AAP : आम आदमी पक्षाचे प्रमुख (AAP) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विफल करण्याच्या उद्देशाने देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश आणला आहे. या अध्यादेशाला रोखण्यासाठी केजरीवाल विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद […]
Cheetah Cubs died : नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणल्या गेलेल्या चित्त्यांसाठी देशातील वातावरण मारक ठरत आहेत. चित्ते सातत्याने मृत्यूमुखी पडत आहेत. फक्त दोन दिवसात तीन बछड्यांचा मृत्यू (Cheetah Cubs Died) झाला आहे. तर चौथ्या बछड्याची प्रकृती गंभीर आहे. मध्य प्रदेशच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी सकाळी एक बछड्याचा मृत्यू झाला होता. […]
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नूकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत शरद पवारांनी दिल्लीकरांना वाचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना कानमंत्र दिला आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन करत असल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल दोन […]