नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi) यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर […]
नवी दिल्ली : दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजेच JNU मध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचं समजतंय. शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेवरून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविप कडून एका सभेचं आयोजन करण्यात […]
गुवाहाटी : अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात रविवारी भूकंपाचे (earthquakes) धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम भागात दुपारी १२.१२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, तर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी १ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12.12 वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूटान […]
नवी दिल्ली : देशभरात गव्हाच्या किंमतीमध्ये (Wheat Price) मोठी वाढ झालीय. केंद्र सरकार (Central Government) गव्हाच्या किंमती कमी करण्यासाठी सातत्यानं पावलं उचलताहेत. नुकतेच केंद्र सरकारनं गव्हाच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी 30 लाख मेट्रिक टन गहू बाजारात आणण्याची घोषणा केली होती. यानंतर गव्हाच्या दरावर परिमाम होताना दिसत आहे. अशातच सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मार्च महिन्याच्या […]
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटी कौन्सिलची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत पूर्ण झाली आणि या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अपीलीय न्यायाधिकरणाच्या स्थापनेसोबतच पान मसाला आणि गुटख्यावरील जीएसटीवरही चर्चा झाली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोठ्या घोषणा […]
पाटणा : लोकसभेच्या (Loksabha) पुढील वर्षीच्या निवडणुकीची भाजपसह अन्य पक्षांनीही तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) आतापासूनच चर्चेचा विषय ठरत असून तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशातच देशातील आगामी लोकसभा निवडणुकांविषयी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी मोठे विधान केले आहे. ‘भारत जोडो यात्रे (India Jodo […]