Imran Khan Convoy Car Accident : पाकिस्तानमध्ये एकीकडे इम्रान खानच्या अटकेवरून वातावरण तापलेले असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांना न्यायालयात नेले जात असताना ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून, या अपघातात इम्रान खान थोडक्यात बचावले आहेत. A vehicle in the convoy […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जून महिन्यात पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन पंतप्रधान मोदींचे यजमानपद भूषवणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी व्हाईट हाऊसमधून नियोजन सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसशी निगडित लोकांनी सांगितले की या वर्षी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष बिडेन पंतप्रधान मोदींसाठी स्टेट डिनरचे आयोजन करतील. मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान […]
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुन्हा एकदा युट्यूब (YouTube) आणि फेसबुकवर (Facebook) एंट्री झाली आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतताच त्यांनी लिहिले I’M BACK! म्हणजेच मी परत आलो आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या सोशल अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती. अखेर दोन वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा […]
Microsoft कॉर्प-बॅक्ड स्टार्टअप OpenAI ने ChatGPT, GPT-4 ची नवीन आवृत्ती आणली आहे. असे म्हटले जात आहे की हे एक शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील, विश्वासार्ह आणि अचूक माहिती देते. नवीन आवृत्तीबद्दल असा दावा केला जात आहे की ते प्रश्नांची अधिक अचूक उत्तरे देत आहे. ते आजारावर योग्य औषधही सांगतो. GPT-3.5 चा […]
Israel Records 2 Cases Of New Covid Variant : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या बाधितांमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात येत होती. मात्र, आता पुन्हा एकदा जगातील काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यात आता इस्त्राइलमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. भारतात कोरोना […]
न्यूझीलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. न्यूझीलंडच्या कर्माडेक बेटावर आज सकाळी भूकंप (Earthquake) झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, या भुकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून 10 किलोमीटर आत होता. दरम्यान, भूकंपानंतर, USGS ने न्यूझीलंडमध्ये सुनामीचा इशारा जारी केला. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या स्थानिक वेळेनुसार हा भुकंप 8.56 वाजता झाला. या भूकंपाची […]