नांदेड : नांदेडमध्ये भाजपकडून पाकिस्तान आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पुतळा जाळताना भडका उडाल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचा हात भाजला आहे. यावेळी जवळ असलेल्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ आग विझवली. यामध्ये चिखलीकरांचा हात किरकोळ भाजला. गेल्या काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल […]
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.