गंगटोकः सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झालेत. उत्तर सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत. दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. […]
काठमांडू : 70 आणि 80 च्या दशकातील सीरिअल किलर चार्ल्स शोभराज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. 19 वर्षांपासून तो नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. चार्ल्स शोभराजची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याची सुटका […]
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या कोरोना आढावा बैठकीच्या एका दिवसानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारने इंट्रानोजल कोरोना लसीला मंजुरी दिली. भारत बायोटेकची ही नाकातील लस आजपासून बूस्टर डोस म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध […]
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना नवा व्हेरियंटचा उद्रेक झाल्याचं चित्र चीनमध्ये दिसून येत आहे. मात्र, भारतात अद्याप या नव्या व्हेरियंटचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत नसून आत्तापर्यंत चार जणांना या नव्या व्होरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली […]
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले. डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून […]
नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे तसेच लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर […]