टॅरिफ बॉम्बनंतर भारताचा अमेरिकेला मोठा झटका?; करोडोंच्या डीलबाबत सरकारचं स्पष्टीकरण

टॅरिफ बॉम्बनंतर भारताचा अमेरिकेला मोठा झटका?; करोडोंच्या डीलबाबत सरकारचं स्पष्टीकरण

India US Trade : भारताने अमेरिकेसोबत संरक्षण खरेदीशी संबंधित चर्चा थांबवल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती संरक्षण मंत्रायलयाने (Defence Ministry) दिली आहे. तसेच अमेरिकेसोबत संरक्षण खरेदीची (India US Trade) विविध प्रकरणे सध्याच्या प्रक्रियेनुसार प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारताने टॅरिफ (Tariff) वादानंतर नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती समोर आली होती मात्र याबाबात संरक्षंण मंत्रालयाने स्पष्टीकरण देत अमेरिकेसोबत व्यवहार सुरु राहणार असल्याची माहिती दिली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारतात असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे, भारत सरकारने नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना पुढे ढकलली असल्याचा दावा माध्यमांमध्ये करण्यात आला होता.

ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर जुलै महिन्यात देखील भारतावर टॅम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतावर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.

तर दुसरीकडे जर भारताने टॅरिफवर काही प्रत्युत्तर दिले तर पुन्हा नवीन निर्बंध लावण्यात येणार असल्याचा इशारा देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे.

आनंदाची बातमी, LPG गॅस स्वस्त मिळणार, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली 30,000 कोटी रुपयांची मान्यता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube