पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू…उदयनिधी स्टॅलिन यांचा जुना संदर्भ देत ‘विजय’ यांच्यावर निशाणा…
तामिळनाडूत पोलिस कोठडीत मृत्यू प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Udaynidhi Stalin On CM Vijay : गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूच्या कन्याकुमारीत घडलीयं. या घटनेवरुन विरोधकांकडून मुख्यमंत्री विजय जोसेफ (Vijay Josef) यांना टार्गेट करण्यात येत असून आता गप्प का? असा थेट सवाल विजय जोसेफ (Udaynidhi Stalin) यांना विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिस कोठडीत मारहाण झाल्यानेच मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडूत सध्या या प्रकरणावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र दिसून येत आहे.
“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
कन्याकुमारी जिल्ह्यातील एका कारागृहात 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झालायं. गुटखा विक्रीचा आरोप या व्यक्तीवर होता. संबंधित व्यक्तीला 9 जुलै रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोमवारी सकाळी तुरुंगात या व्यक्तीचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. तुरुंगात मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदन अहवालातही त्याच्या शरीरावर जखमेच्या 19 खुणा आढळून आल्या आहेत.
आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावू धरला आहे. या प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्हाला न्याय हवा आहे, ‘रील्स’ नकोत, असं स्टॅलिन म्हणाले आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तत्कालीन मंत्री एम. के. स्टॅलिन यांनी माफी मागितली होती, तेव्हा विजय यांनी म्हटले होते की त्यांना माफी नको, तर न्याय हवा आहे. आता याच प्रकरणाचा संदर्भ स्टॅलिन यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम
दरम्यान, कन्याकुमारी जिल्ह्यातील एका कारागृहात ३५ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा कोठडीत झालेला मृत्यू हे प्रकरण आता चिघळत चालले आहे. या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी वॉर्डनसह कारागृहातील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या मुद्द्यावरून द्रमुक (DMK) विजय यांच्या सरकारला लक्ष्य करत असून, विजय यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडूमध्ये जेव्हा द्रमुकची सत्ता होती, तेव्हा विजय यांनी कोठडीतील मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला होता.