US Army Attack On Syria : मोठी बातमी, अमेरिकेचा सीरियावर मोठा हल्ला, अनेक दहशतवादी ठार

US Army Attack On Syria : सीरियामध्ये अमेरिकेने मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

  • Written By: Published:
US Army Attack On Syria

US Army Attack On Syria : सीरियामध्ये अमेरिकेने मोठा हवाई हल्ला केला असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकन सैन्याने सीरियातील दहशतवादी संघटना आयसिसविरुद्ध ऑपरेशन “हॉकआय” राबवत आयसिसच्या 70 हून अधित तळांवर बॉम्ब हल्ला केला आहे. माहितीनुसार, या बॉम्बहल्लात अनेक दहशतवादी ठार झाले असून सर्व तळ उद्ध्वस्त झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी सीरियातील पालमीरा शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक (US Army) आणि एका नागरिकाच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि स्वतः अध्यक्ष ट्रम्प यांनी हल्ल्याची पुष्टी केली. संरक्षण सचिव हेगसेथ यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये मध्य सीरियामध्ये अमेरिकन सैन्याच्या हॉकआय ऑपरेशनचे वर्णन केले.

संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी सांगितले की सीरियामधील आयसिस तळांवर आणि लढाऊंवर ऑपरेशन हॉकआय सुरू करण्यात आले आहे. ज्या दिवशी अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला, त्याच दिवशी हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा इशारा देण्यात आला होता. आम्ही जगात कुठेही हल्लेखोर लपले असतील तिथे घुसून त्यांना मृत्युदंड देऊन त्यांचा बदला घेऊ.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर लिहिले की आयसिसने सीरियामध्ये अमेरिकन देशभक्तांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. आज, मी माझ्या देशवासियांना कळवू इच्छितो की, वचन दिल्याप्रमाणे, अमेरिकेने त्यांच्या मारेकऱ्यांविरुद्ध जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. अमेरिकन सैन्य सीरियामधील आयसिसच्या तळांवर जोरदार आणि जलद हल्ले करत आहे.

राज्यातील ‘या’ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरु, 21 डिसेंबरला होणार मतमोजणी

follow us