काय सांगता! अमेरिकेतही उपासमार; ४.७४ कोटी लोकांसमोर अन्नसंकट गडद
USA Food Problem : जगातील सर्वात सधन आणि आर्थिक महासत्ता म्हणजे अमेरिका. या देशातील लोकांना कशाचीच (USA Food Problem) कमतरता नाही असेच तुम्हाला वाटत असेल पण थांबा असं काही नाही. अमेरिकेतही लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. अमेरिकेत आजमितीस सात कुटुंबापैकी एक कुटुंब खाद्य संकटाला तोंड देत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जवळपास ४.७४ कोटी अमेरिकी नागरिक या संकटाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये १.३८ कोटी लहान मुले आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या २०२३ मधील संयुक्त राज्य अमेरिकेत घरेलु खाद्य सुरक्षा अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार ५.१ टक्के अमेरिकी कुटुंबांनी (२० पैकी १ कुटुंब) अतिशय कमी प्रमाणात खाद्य सुरक्षेचा अनुभव घेतला. एक सक्रिय आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला अगदी सहज अन्न मिळाले पाहिजे अशी खाद्य सुरक्षेची व्याख्या अमेरिकी कृषी विभागाने केली आहे. यानुसार विचार केला तर खाद्य असुरक्षेने प्रभावित कुटुंबांना एकतर पुरेशा प्रमाणात भोजन खरेदी करता येत नाही किंवा त्यांना ते सहज उपलब्ध होत नाही अशी स्थिती आहे.
UNSC चं सामर्थ्य किती? भारताला का हवाय वीटो पॉवर? अमेरिका-ब्रिटन तयार मग नकार कुणाचा?
अमेरिकेतली अश्वेत कुटुंबांमध्ये खाद्य असुरक्षा सर्वाधिक म्हणजे २३.३ टक्के इतकी आहे. यानंतर लॅटिन अमेरिकी लोकसंख्येत हे प्रमाण २१.९ टक्के इतके आहे. श्वेत परिवाराच्या तुलनेत हा दर दुप्पट आहे कारण ९.९ टक्के श्वेत कुटुंब खाद्यान्नच्या बाबतीत असुरक्षित आहेत.
४० टक्के अमेरिकी गरिबीपासून एक पगार दूर
आर्थिक संस्था प्रॉस्पेरिटी नाऊनुसार अनेक अमेरिकी परिवार आर्थिक असुरक्षेच्या संकटाचा सामना करत आहेत. लाखो मध्यमवर्गीय अमेरिकी नागरिक जर एका महिन्याचा पगार चुकला तरी गरीब होतात अशी स्थिती या देशात आहेत. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला जर एक महिन्याचा पगार मिळाला नाही तर त्याचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडून पडते. १० पैकी ४ लोकांना अशी समस्या निर्माण झाली तर यावर मार्ग काढण्यात अनेक अडचणी येतात. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. म्हणजेच ४० टक्के अमेरिकी गरिबीपासून फक्त एक पगार दूर आहेत. सीबीएस न्यूजने २०१९ मध्ये हे वास्तव समोर आणले होते. आज पाच वर्षांनंतरही यात फार फरक पडल्याचे दिसत नाही.
बांग्लादेशातील कोणतं बेट मागत होता अमेरिका? नकार देताच शेख हसीनांचं सरकारच गेलं