Boat Sink : मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटली, पाण्यात बुडून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Boat Sink : मोठी दुर्घटना! नदीत बोट उलटली, पाण्यात बुडून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Boat Sink in Central African Republic : मध्य आफ्रिकन रिपब्लीकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या देशात प्रवाशांनी भरलेली एक बोट उलटून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी शनिवारी ही माहिती दिली.प्रत्यक्षदर्शी लोकांनी एसोसिएटेड प्रेसला सांगितलं की लाकडाच्या मदतीने ही नाव तयार करण्यात आली होती. शुक्रवारी या नावेत 300 प्रवासी प्रवास करत होते.

ही बोट राजधानी बंगुई येथून निघाली होती. मपोको नदी पार करत असतानाच ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नौकाचालक आणि मासेमारी करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्याला सुरुवात केली. यानंतर सैन्याचे जवानही येथे दाखल झाले. त्यांनी नदीत उतरून  बचावकार्याला सुरुवात केली. जे जिवंत होते त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दवाखान्यात नेण्याची गरज असलेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

India-China Border : गलवान आणि पॅंगॉन्गमध्ये अचानक हालचाली वाढल्या, भारतीय सैन्य एक्शनमध्ये

या बचावकार्यातील एक व्यक्ती एड्रियन मोसामो म्हणाला, या ठिकाणी सेना येईपर्यंत कमीत कमी 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. बंगुई युनिव्हर्सिटी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले की सेनेने शोधमोहिमेला गती दिल्यानंतर मृतांच्या संख्येत आणखी वाढ होत चालली आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणखीही काही मृतदेह पाण्यात आहे. या मृतदेहांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube