Uday Samant : गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक कुठुनही लढेल… भास्कर जाधव असे काेणाबाबत म्हणाले ?

Uday Samant : गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक कुठुनही लढेल… भास्कर जाधव असे काेणाबाबत म्हणाले ?

मुंबई ः माझा मतदार संघ सुरक्षित आहे. पण गद्दारांना धडा शिकवण्यासाठी यश-अपयशाचा तुम्ही विचार न करता तुम्ही निवडणूक लढवा, असे जर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर यश-अपयशाचा काेणताही विचार न करता मी कुठुनही निवडणूक लढवून गद्दारांना धडा शिकवेल, असा टाेला रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे नाव न घेता गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी लगावला.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, भास्कर जाधव जर रत्नागिरीतून निवडणूक लढणार असतील, तर त्यांचे आम्ही स्वागतच करु. तसेच मी सुद्धा गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवू शकताे आणि निवडून देखील येऊ शकताे, असे म्हणत भास्कर जाधवांचे आव्हान स्वीकारले.

उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर रत्नागिरीतून निवडणूक लढवेन, असे भास्कर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावर बोलताना उदय सामंतांनी पक्षाच्या प्रमुखांनी आदेश दिला तर गुहागरमधूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्यामुळे आता रत्नागिरी की गुहागर हा निर्णय ठाकरे आणि शिंदे गटाच नेत्यांच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. शिंदे गटात ठाकरे गटाचे अनेक आमदार गेल्याने कोकणात नव्याने बांधणी करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. दापोली-मंडणगडमधील माजी आमदार संजय कदम यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता रत्नागिरीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून आहे. त्याची चाचपणी सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube