राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात काय घडतय; सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती तात्पुरती रद्द

यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ता पदांच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त करण्यात आल्या आहेत.

News Photo   2026 08 04T173917.679

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तात्पुरत्या रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्ता पदांच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त करण्यात आल्या आहेत.

या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका केवळ माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच माध्यमांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वतीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा अधिकार या दोघांकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्राची प्रत सर्व प्रवक्ते, संबंधित पदाधिकारी तसेच संपादक, प्रसिद्धी प्रमुख आणि वृत्तवाहिन्यांना पाठविण्यात आली आहे.

follow us