दु:खद बातमी! ध्वजारोहण सुरू असताना पोलीस कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
उमरगा येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या निधनाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागात शोककळा पसरली आहे.
धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण (Republic Day) कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली. हा कार्यक्रम सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मोहन जाधव (वय ५५) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. तिरंग्याला मानवंदना देत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
जाधव हे सोलापूरचे रहिवासी होते आणि उमरगा येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या निधनाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी सकाळी धाराशिवमधील तलमोड येथील चेक पोस्टवर ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आलं होतं. मोहन जाधव हे पोलीस कर्मचारी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते.
नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांवर महिला पोलिक का भडकल्या?, नक्की काय घडलं?
ध्वजवंदन सुरू असताना आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. परंतु त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर हा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी ही घटना घडली. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जाधव हे तिरंग्यासमोर उभे होते आणि अचानक त्यांचा तोल गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
