Video : आम्ही गुंगी गुडिया म्हटलो, तुम्ही दुर्गा व्हा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय म्हणाले?

आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जी उपादी दिली आहे ती अतिशय योग्य आहे. त्यामध्ये काहीही चूक नाही असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

News Photo   2026 08 04T144615.672

मुळ मुद्दा आहे तो पत्रकारांनी आणि काही (Sunetra Pawar) नागरिकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारले. दरम्यान, ज्या व्यक्तीकडं महाराष्ट्र गुंड म्हणून पाहतो, तो व्यक्ती लोकप्रतिनिधी असला तरी त्याच्यावर अनेग गंभीर गुन्हे आणि त्याची वागणूक गुंड प्रवृत्तीची आहे असं म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडीया यावरून सुरू असलेल्या गदारोळाला उत्तर दिलं आहे. ते आयोजीत पत्रकार परिषदेत होलत होते.

आम्ही त्यांना गुंगी गुडिया म्हटलं असेल, तर त्यांनी आपण दुर्गा आहे हे सिद्ध करावं. ते सिद्ध करण्याकरता अजित दादांच्या अपघाताचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं, त्यांनी ताबडतोब अर्थखातं स्वत:च्या पक्षाकडे घ्यावं. लाडक्या बहिणींचं अनुदान जे 1500 वरून वाढवण्यात येणार होतं, त्यांनी ते ताबडतोब 2100 रुपये करावं, असं म्हणत सपकाळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने काँग्रेसने ट्विट केलं, त्या पीसीमध्ये पत्रकार प्रश्न विचारत होते. पण एक लोकप्रतिनिधी ऐवजी गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तीमत्व पुढे आलं, अशा प्रवृत्तीची ओळख असणारा, अशी अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, त्याने पत्रकारांना एकेरीत बोलून चुप्प बसवलं. आणि अशा वेळेस उपमुख्यमंत्री ( सुनेत्रा पवार) एक शब्दही बोलल्या नाहीत.

उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नसेल, आणि आमदाराकरवी जर त्या पत्रकारांना चूप बसवत असतील तर हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी, तोंडावर बोट ठेवणं, चुप बसणं अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी घेतल्याने, ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्यात आला, ते वर्णन योग्य आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं.

हा मुकेपणा अशोभनीय

गुंगी गुडिया ही शिवी आहे का, तो अपशब्द आहे का, तो काही असंसदीय शब्द आहे का ? तर नाही, ते एक वर्णन आहे. हा शब्द उपमुख्यमंत्र्यांवर अतिशय व्यवस्थितपणे बसला आहे. त्या अनेक विषयावर बोलत नाहीत. अजित दादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही, त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातप्रकरणी गुन्हा अद्याप दाखल का झालेला नाही, त्यावरही त्या बोलत नाहीत.

यासोबतच, अर्थखातं त्यांना अद्याप का मिळालं नाही, त्यावरही त्यांचं मौन आहे. त्यांच्या अधिकारावर आणि त्यांच्या पक्षावर भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात गदा आणत आहे, त्यावरही त्या ( सुनेत्रा पवार) काही बोलत नाहीत. असं एकंदरीत , त्यांनी जे बोलणं थांबवलं आहे, जो मुकेपणा आणलेला आहे. सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला हा मुकेपणा अशोभनीय आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

ताटाखालचं मांजर झालं आहे

मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगी गुडिया तर आहेतच आहेत, पण भारतीय जनता पक्षाकडून, रोज त्यांच्या ( राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षाचे, त्यांच्या आमदारांचे, त्यांच्या खात्यातल्या मंत्र्यांचे, त्यांचे जे हाल होत आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या विभागाकडे विशेष लक्ष देत नाहीत, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा मोदी- अमित शहांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे का , अशी संशयाची स्थिती झाली आहे, अशी घणाघाती टीकाही सपकाळ यांनी केली.

follow us