मोठी बातमी! मुंबई महापालिकेसाठी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर, मलिकांच्या कुटुंबात कुणाला संधी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली पहिली यादी आज सायंकाळी जाहीर केलेली आहे...
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, (Election) राष्ट्रवादी अजित पवार गटानं महापालिका निवडणुकीमध्ये आघाडी घेतली आहे. पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये एकूण 36 उमेदवारांचा समावेश आहे.
यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची आघाडी रिंगणात असणार आहे. तर अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता असून, अजित पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
नावांची यादी खालीलप्रमाणे
मनीष दुबे, सीील पिटर डिसोझा, अहमद खान, बबन मदने, सुभाष पाताडे, सचिन तांबे, सज्जू मलिक, शोभा रत्नाकर जाधव, हरिश्चंद्र जंगम, अक्षय पवार, ज्योती सदावर्ते, रचना गवस, भाग्यश्री केदारे, सोमू पवार, अब्दुल शीद मलिक, चंदन धोंडीराम पाटेकर, दिशा मोरे, सबिया मर्चेट, विलास घुले, अजय विचारे, हदिया कुरेशी, ममता ठाकूर, युसुफ मेमन, अमित पाटील, धनंजय पिसाळ, प्रतीक्षा घुगे, नागरत्न बनकर, चांदणी श्रीवास्तव, दिलीप पाटील, अंकिता दुबे, लक्ष्मण गायकवाड, सईदा खान, बुशरा मलिक, वासंथी मुरुगेष देवेंद्र, किरण रविंद्र शिंदे आणि फरीन इम्तियाझ खान यांना संधी देण्यात आली आहे.
