भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याला 1,40,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:
भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती, महिन्याला 1,40,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

AAI Recruitment 2024 : अनेकजण आज सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रचंड स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India) आज 2 एप्रिलपासून कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान, याच भरती प्रक्रियेचे तपशील जाणून घेऊ.

Parbhani Loksabha : ‘वंचित’कडून फेरबदल! परभणीत दिला तगडा उमेदवार 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल 2024 पासून सुरू झाली. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त aai.aero द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी या आधी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा.

Government Schemes : मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

रिक्त जागांचा तपशील
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध वेतनश्रेणींमध्ये एकूण 490 कनिष्ठ कार्यकारी पदे भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) – ३ पदे,
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – सिव्हिल) – 90 पदे.
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) – 106 पदे.
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 278 पदे.
कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) – 13 पदे

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदनिहाय आहे. या पदभऱतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आर्किटेक्चर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं असावं.

अर्ज कसा करायचा?
पायरी 1: aai.aero अधिकृत वेबसाइटला भेट द्या
पायरी 2. मुख्यपृष्ठावरील कनिष्ठ कार्यकारी 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करा
पायरी 3. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा
चरण 4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा
पायरी 5. फॉर्म सबमिट करा आणि डाउनलोड करा
पायरी 6. डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाचे प्रिंट आउट घ्या.

पगार-

कनिष्ठ कार्यकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 40,000-1,40,000 च्या दरम्यान वेतन मिळेल. मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना AAI नुसार महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या 3 टक्के वार्षिक वाढ, मूळ वेतनाच्या 35 टक्के भत्ता, HRA आणि ग्रॅच्युइटी सारखे लाभ मिळती.

अधिसूचना – https://cdn.dicialm.com//per/g01/pub/726/EForms/image/ImageDocUpload/12/1114056952739077494586.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/88079/Index.html

अर्ज फी
SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. परंतु इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 300 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज