Government Schemes : मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : शेतकऱ्यांना (Farmer)शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन मधुमक्षिका पालन योजनेला (honey beekeeping scheme)प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत (National Agricultural Development Programme)ही योजना लघुउद्योग श्रेणीत आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान योजना नव्याने सुरू केली आहे.

पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, तटकरेंनी केली घोषणा

योजनेच्या प्रमुख अटी :
▪ लाभार्थीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
▪ लाभार्थीकडे किमान 40 आर कांदळवन क्षेत्र असणे आवश्यक.
▪ योजनेसाठी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ दिला जातो.
▪ लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय किमान 3 वर्षे करणे आवश्यक आहे.
▪ या घटकास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेत स्थळावर, ग्रामसभा कार्यालयातील नोटीस बोर्ड, कार्यमहिमा, मेळावे आदीद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.
▪ या घटकांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार मधुमक्षिका पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे.
▪ मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक इतर व्यवस्था लाभार्थ्यांने स्वतः करावयाची आहे.

पहिल्याच आठवड्यात ‘द गोट लाइफ’ची कोट्यवधींची कमाई, लवकरच पार करणार बजेटचा आकडा

आवश्यक कागदपत्रे :
– पासपोर्ट फोटो
– 7 /12 उतारा
– 8 अ उतारा
– बँक पासबुक
– आधार कार्ड
– हमीपत्र

लाभाचे स्वरूप असे :
मधुमक्षिका संच : प्रति 2 हजार रुपये : 50 संचासाठी 1 लाख रुपये एकूण खर्च ; 40 टक्के अनुदान.
मधुमक्षिका वसाहत : प्रति 2 हजार रुपये : 50 संचासाठी 1 लाख रुपये एकूण खर्च ; 40 टक्के अनुदान.
मध काढणी यंत्र व फूड ग्रेड मध कंटेनर : 20 हजार प्रति युनिट प्रमाणे 40 टक्के अनुदान.

या ठिकाणी संपर्क साधावा :
– महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय.
– तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कार्यालय.

संकेतस्थळ : https://dbt.mahapocra.gov.in

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube