डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 127 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 127 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

DRDO Recruitment 2024: जर तुमचं आयटीआयचं (ITI) शिक्षण झालं असेल तर तुम्हाला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये सरकारी नोकरी (Govt job) मिळण्याची चांगली संधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली. या भरतीअंतर्गत एकूण 100 हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान, या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, नोकरीचे ठिकाण आदी तपशील जाणून घेऊ.

मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणे सज्ज; ठाकरेंच्या राऊतांचंही कडवं आव्हान 

नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमदेवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तुम्ही drdo.gov.in या वेबसाईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची तपशीलवार माहिती सहज मिळवू शकता.

Amrita Khanwilkar : अमृता खानविलकरच्या सौदर्यांची चाहत्यांना भुरळ 

या भरती प्रक्रियेद्वारे, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्स लॅबोरेटरी हैदराबादमध्ये 127 पदे भरली जातील. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही घालण्यात आली आहे. ITI चे शिक्षण घेतलेले उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांना प्रथम apprenticeshipindia.gov.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि नंतर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2024 आहे. अपुरी माहिती असलेले किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज करणे नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे –
दहावी परीक्षेची गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे.

या भरतीसीाठी अर्ज करायला फारच कमी दिवस राहिलेले आहेत. त्यामुळं इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube