Government Schemes : कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes: कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Scheme)देशाचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley)यांनी लॉन्च केलेली केंद्र सरकारची (Central Govt)योजना आहे. या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे, कमीत कमी किंमतीत सौर कृषी पंप (Solar Agricultural Pumps)उपलब्ध करुन शेतकऱ्यांना (Farmer)देणे. या योजनेत एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.

स्वबळाचा नारा देताच पुण्यातून पहिला आवाज; मनसेच्या साईनाथ बाबरांचा हडपसरवर दावा

योजनेचा लाभ कसा मिळतो?
– सरकारकडून शेतकर्‍यांना 60 टक्के अनुदान दिले जाते.
– 30 टक्के खर्च हा सरकार कर्ज स्वरुपात देते.
– शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ 10 टक्के रक्कम द्यावी लागेल.
– या योजनेंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो.
– वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करु शकतो.

Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाडचं शेतातील मनमोहक फोटोशूट

योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
– अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार.
– बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असणार आहेत.
– ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असणार आहेत.
– 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP DC, 5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC, 5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषीपंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये काय?
– पारेषण विरहित 3814 कृषी पंपाची महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये स्थापना करण्यात येणार आहे.
– कुसुम योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य होणार आहे.
– शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
– सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केला आहे.
– शेतकऱ्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहे.

योजनेचा लाभ कसा मिळतो?
– शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा मिळतो.
– शेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.
– भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
– शेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.
– शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.

योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
– अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
– या योजनेंतर्गत, स्वयं-गुंतवणुकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रतेची आवश्यकता नाही.
– अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमतेच्या (जे कमी असेल) प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
– सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
– प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट 1 कोटी रुपये आहे.
– प्रति मेगावॅट अंदाजे 2 हेक्टर जमीन आवश्यक आहे.

कुसुम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
– शेतकरी
– सहकारी संस्था
– शेतकर्‍यांचा गट
– जल ग्राहक संघटना
– शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजनेसाठी महत्वाची कागदपत्रे :
– आधार कार्ड
– पासपोर्ट साईझ फोटो
– रेशन कार्ड
– नोंदणी प्रत
– प्राधिकरण पत्र
– जमीन प्रत
– चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेलं नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
– मोबाइल नंबर
– बँक खाते विवरण

कुसुम योजनेसाठी अर्ज फी :
– कुसुम योजनेंतर्गत अर्जदाराला सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅटसाठी 5000 आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल.
– राजस्थान नूतनीकरण योग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रुपात ही देय रक्कम दिली जाईल.
– 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट पर्यंतच्या अर्जांसाठी अदा करावयाचे शुल्क खालीलप्रमाणे…

– 0.5 मेगावॅटसाठी 2 हजार 500 रुपये आणि जीएसटी
– 1 मेगावॅटसाठी 5 हजार रुपये आणि जीएसटी
– 1.5 मेगावॅटसाठी 7 हजार 500 रुपये आणि जीएसटी
– 2 मेगावॅटसाठी 10 हजार रुपये आणि जीएसटी

कुसुम योजनेचा अर्ज कसा भरावा?
कुसुम सोलर योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्या जवळच्या महाऊर्जा मेडा कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा https://www.mahaurja.com/meda/en/cont… या संकेतस्थळाला भेट द्या.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube