‘दोषींवर कडक कारवाई करा’; नांदेडच्या घटनेवरुन चित्रा वाघ यांचा संताप
Nanded Death : नांदेडच्या रुग्णालयात 24 रुग्ण दगावणं गंभीरच, घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी केली आहे. नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. मागील 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेप्रकरणी चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे .
World Cup 2023 : पुण्याचे MCA स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमचे रंजक किस्से
चित्रा वाघ म्हणाल्या, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दिवसभरात २४ रुग्ण दगावल्याची घटना निश्चितच गंभीर आहे. या घटनेत 12 प्रौढ आणि 12 नवजात बालकांचा समावेश होता. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार दगावलेले प्रौढ रुग्ण हृदयविकार जठर आजार होते. किडनी आजार, प्रसुती विषबाधा अपघात या आजारांमुळे दगावले असल्याचं वाघ म्हणाल्या आहेत.
Maratha Reservation : मराठ्यांनो, छगन भुजबळला ताकद देऊ नका; जरांगे पाटलांनी साधला निशाणा
तसेच बालकांपैकी काही बालके खासगी रुग्णालयातून अंतिम अवस्थेत येथे आले असताना त्यांचा मृत्यू झाला असून 24 रूग्ण दगावले आहेत. थातूर मातूर उत्तर देऊन हॅास्पिटल प्रशासनाला जबाबदारी टाळता येणार नाही. एकंदरीत रुग्णांच्या गंभीर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला की औषधांचा तुटवडा प्रशासकीय हेळसांड आरोग्यिक बेजाबदारपणा यापैकी कोणते कारण आहे, याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
चिंता वाढणार! नऊ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; सांगलीत सर्वाधिक 44 टक्के तूट
दरम्यान, या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करावी, असंही त्या म्हणाल्या आहेत. या घटनेप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तत्काळा रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी ते म्हणाले, रुग्णालयात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ
यामध्ये 8 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही प्रसूती झालेल्या महिलांचाही समावेश आहे. काही रुग्णांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक असून अनेक नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत, डॉक्टरांची कमतरता असल्याने शासनाने इथल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
नांदेडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांकडून त्यांची समिती मंगळवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात येत आहे.