Lok Sabha Election: एकनाथ शिंदें अजितदादांना मोठा धक्का! कोणाला किती जागा ?
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे.
या पोलमध्ये देशातील 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत 1 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान 25 लाख नागरिकांचे नमुने घेऊन हा पोल तयार करण्यात आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील 48 जागांसाठी देखील सर्व्हे करण्यात आला आहे. या पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला (ShivSena) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला शुन्य जागा मिळण्याचा अंदाज आहे. यासोबतच या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त तीन जागा मिळणार असल्याचा अहवाल समोर आला आहे.
राज्यात कोणाला किती जागा?
राज्यात या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 28 जागांवर विजय मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. भाजपला या निवडणुकीत 25 जागा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला3 जागा आणि अजित पवार गटाला एकही जागेवर यश मिळणार नसल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीत 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू शकतो. ठाकरे गटाला या निवडणुकीत 10 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसला 5 – 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 40.22 टक्के आणि महाविकास आघाडीला 40.97 टक्के मतं मिळण्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.