मोदींच्या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार…विखेंना विश्वास

मोदींच्या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार…विखेंना विश्वास

Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार आहे. तसेच 400 पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार असा विश्वास महायुतीचे (Mahayuti) उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी व्यक्त केला.

2014 प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले. श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रचार सभेत ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार चांगलाच गाजत आहे. ठिकठिकाणी त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. गावोगाव पिंजून काढत असताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे. मागील पाच वर्षात त्यांनी केलेली विकास कामे त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या दशकात झालेली कामे हा त्यांचा प्रचाराचा अजेंडा आहे. विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना आवाहन करत आहेत.

शनिवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवरसांगवी, बनप्रिंपी, थिडे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहेत. या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी 4 जून रोजी देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार असून या स्वप्नाची पायाभरणी केली जाणार आहे.

मागील 10 वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशवासियांचा विश्वास वाढला आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पार चा आकडा सहज गाठता येणार आहे. जिल्ह्यातही लोक नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणुन पाहू इच्छित आहेत.

‘तू किस झाड की पत्ती है’, तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा

यामुळे राज्यातही महायुतीचा 45 हून अधिक जांगावर विजय निश्चित आहे. निवडणुक अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान मोदी यांचे क्रेज वाढत आहेत. तुम्ही दिलेला प्रतिसाद ही माझ्या विजयाची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube